जनतेची इच्छा असेल तर निवडणूक लढवू

By Admin | Updated: August 17, 2014 00:53 IST2014-08-17T00:37:07+5:302014-08-17T00:53:26+5:30

जनतेची इच्छा असेल तर आपण निवडणूक लढवू, असे भाऊराव कारखान्याच्या उपाध्यक्षा अमिताताई चव्हाण यांनी मुदखेड तालुक्यातील कार्यक्रमामध्ये सांगितले.

If the people want to contest the election, we will fight it | जनतेची इच्छा असेल तर निवडणूक लढवू

जनतेची इच्छा असेल तर निवडणूक लढवू

भोकर : भोकरचे प्रतिनिधित्व करणारे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आता लोकसभेत खासदार आहेत. त्यामुळे भोकरचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कार्यकर्ते व मतदारांमधून आपल्या नावाचा आग्रह धरला जात आहे. जनतेची इच्छा असेल तर आपण निवडणूक लढवू, असे भाऊराव कारखान्याच्या उपाध्यक्षा अमिताताई चव्हाण यांनी मुदखेड तालुक्यातील कार्यक्रमामध्ये सांगितले.
मुदखेड तालुक्यातील पाथरड रेल्वेस्टेशन, हिस्सा पाथरड, सरेगाव, इजळी येथे विविध कार्यक्रम झाले. यावेळी मंचावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आमदार अमरनाथ राजूरकर, ‘भाऊराव’ चे चेअरमन गणपतराव तिडके, तालुकाध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर, जि.प. सदस्या प्रतिभाताई देशमुख, उपसभापती सुनील देशमुख, बाळासाहेब देशमुख, ‘भाऊराव’चे संचालक दत्तराम अवतिरक, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष भगवानराव देशमुख यांची उपस्थिती होती.
अमिताताई चव्हाण म्हणाल्या, भोकर मतदारसंघ नेहमीच काँग्रेसच्या पाठीशी राहिला. दिवंगत नेते, देशाचे गृहमंत्री शंकररावजी चव्हाण यांच्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना मोठे मताधिक्य देवून विजयी करण्याचा इतिहास रचला. देशात काँग्रेससाठी प्रतिकुल परिस्थिती निर्माण झालेली असतानासुद्धा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना जिल्ह्यातील मतदारांनी मोठे मताधिक्य देवून लोकसभेत पाठविले. यापूर्वी भोकर, मुदखेड मतदारसंघात मोठी विकासकामे झाली.
यापुढेही हा मतदारसंघ टॉपटेनमध्ये आणण्याचे माजी मुख्यमंत्री चव्हाण यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करु. यावेळी सरचिटणीस आमदार राजूरकर म्हणाले, माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्यावर समन्वय समितीचे अध्यक्षपद देवून राज्याची जबाबदारी टाकली आहे.
त्यामुळे भोकर मतदारसंघातील जनतेने अमिताताई यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. तालुकाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर यांनीही भाषण केले. कार्यक्रमास सरपंच कैलास अवतारीक, सरपंच संभाजीराव लोकरे, केवळाबाई बोचरे, मोहन बोचरे, प्रकाश येडके, शंकरराव बोचरे, दत्तराव येडके, नामदेवराव भोकरे, संभाजीराव बोचरे आदींची उपस्थिती होती. अमिताताई यांच्या हस्ते सुमारे एक कोटींच्या विकासकामांचा प्रारंभ झाला. (वार्ताहर)

Web Title: If the people want to contest the election, we will fight it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.