शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

एक क्रमांक ब्लॉक केला तर पोलीस निरीक्षक दुसऱ्या क्रमांकावरून पाठवायचा अश्लील संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 20:00 IST

विवाहितेला अश्लील आणि आक्षेपार्ह मेसेज पाठवून त्रास दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल

ठळक मुद्दे तक्रार देण्यासाठी आलेल्या विवाहितेचा मोबाईल नंबर मिळवला विवाहितेच्या घरी काही लोक दबाव टाकण्याकरिता गेले

औरंगाबाद : विवाहितेला अश्लील आणि आक्षेपार्ह मेसेज पाठवून त्रास दिल्याप्रकरणी सोमवारी रात्री जवाहरनगर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक हनुमंत गिरमेंविरुद्ध गुन्हा नोंदविला. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र गायकवाड यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. गिरमे यांच्याकडून अश्लील मेसेज येत असल्याने विवाहितेने त्यांचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला. एक नंबर ब्लॉक झाल्यानंतर दुसऱ्या नंबरवरून गिरमे यांनी विवाहितेला मेसेज पाठविल्याचे चौकशीत समोर आले. 

जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या विवाहितेचा मोबाईल नंबर मिळवून तिच्या व्हॉटस्अ‍ॅपवर अश्लील आणि आक्षेपार्ह मेसेज पाठविल्याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात सोमवारी मध्यरात्री गुन्हा नोंदविण्यात आला. हा गुन्हा नोंद होऊ नये, याकरिता चार दिवसांपासून विवाहितेच्या घरी काही लोक  दबाव टाकण्याकरिता गेले होते. 

याविषयीची तक्रार पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली; मात्र विवाहिता आणि तिचे कुटुंब तक्रार करण्यावर ठाम होते, यामुळे गिरमेंविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. विवाहितेच्या तक्रारीनुसार पोलीस निरीक्षक गिरमे यांच्याकडून तिला अश्लील मेसेज येण्यास सुरुवात झाल्यांनतर तिने त्यांना असे मेसेज पाठवू नका, असे स्पष्टपणे बजावले होते; मात्र गिरमेंकडून मेसेज येणे सुरूच राहिल्याने विवाहितेने गिरमेंना शिवीगाळ करून त्यांचा मोबाईल क्रमांक व्हॉटस्अ‍ॅपवर ब्लॉक केला. 

यानंतरही गिरमे यांनी त्यांच्या दुसऱ्या मोबाईल क्रमांकावरून विवाहितेला मेसेज पाठविणे सुरू केले. यामुळे विवाहितेने दुसरा क्रमांकही ब्लॉक केला. त्यानंतर गिरमे यांनी विवाहितेच्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेज पाठविल्याचे समोर आले. ही माहिती विवाहितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केल्याचे सूत्रांनी सांगितले. सहायक पोलीस आयुक्तांकडे तपास

गिरमेंविरुद्ध सोमवारी मध्यरात्री दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास उस्मानपुरा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र गायकवाड यांच्याकडे सोपविण्यात आला, अशी माहिती  पोलीस उपायुक्त डॉ.राहुल खाडे यांनी दिली. ते म्हणाले की, या तक्रारीची प्राथमिक चौकशी आपण स्वत: करीत आहोत. प्राथमिक चौकशीचा अहवाल पोलीस आयुक्तांना सादर केल्यानंतर गिरमे यांची खातेनिहाय चौकशी, निलंबन याबाबतचा निर्र्णय पोलीस आयुक्त घेतील. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस