खड्डे थातूर मातूर बुजविल्यास अभियंत्यांवर कडक कारवाई होणार
By Admin | Updated: November 19, 2015 00:21 IST2015-11-18T23:57:41+5:302015-11-19T00:21:28+5:30
जालना : अंबड-वडीगोद्री २२ कि़ मी. रस्त्यावरील खड्डे महिनाभरापूर्वीच मुरूम टाकून बुजवून पैशाची उधळपट्टी झाली असताना आता पुन्हा डागडुजीसाठी १

खड्डे थातूर मातूर बुजविल्यास अभियंत्यांवर कडक कारवाई होणार
जालना : अंबड-वडीगोद्री २२ कि़ मी. रस्त्यावरील खड्डे महिनाभरापूर्वीच मुरूम टाकून बुजवून पैशाची उधळपट्टी झाली असताना आता पुन्हा डागडुजीसाठी १० लाख रुपये निधी मंजूर थातूर मातूर खड्डे बुजवून निधींची उथळपट्टी होत असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच त्याची पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दखल घेतली. परतूर येथे सार्वजनीक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांची बैठक घेऊन कामांच्या दर्जाबाबत अभियंत्यांची कानउघाडणी केली.
दरम्यान वडीगोद्री-अंबड या रस्त्यासह जिल्ह्यातील सर्वच रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी राज्य शासनाकडून ५ कोटीचा निधी मंजूर करून घेतला आहे. तेव्हा खड्डे डांबरीकरणाद्वारे भरण्यात येणार असून त्यावर पहिल्यांदा रोलर फिरून लेवल केली जाणार आहे. (प्रतिनिधी)