शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

पाऊस आला, तर वाहने लावावी लागतात घरापासून दूर; मधुमालतीनगरात अनेक समस्या

By साहेबराव हिवराळे | Updated: July 4, 2024 19:00 IST

एक दिवस एक वसाहत: ना पिण्याचे पाणी मिळते, ना पथदिवे असतात चालू

छत्रपती संभाजीनगर : बायपासला खेटून असलेल्या मधुमालतीनगरातील नागरिकांना पाऊस पडला की, दुचाकी घरापासून दूरवर ठेवूनच घर गाठावे लागते. इतकी दलदल या भागात असते.

या भागात पाणीटंचाई असल्यामुळे सध्या वापरासाठी खाजगी टँकरने पाणी घ्यावे लागते, तर जारच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. जलकुंभाचे काम सुरू असल्याचे सांगितले जाते आणि जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत; परंतु अद्याप नळाला पाणी आलेले नाही. पाणीपुरवठा कधी होईल, हे आजघडीला सांगणे कठीण आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने बायपास रस्त्यावर पाणी देवळाई चौकातून मधुमालतीनगरात वाहून येते. त्यावेळी परिसरातील घरे जणूकाही बेटावर उभारली आहेत की काय, असा भास होतो. रिकामे प्लॉट पावसाच्या पाण्याचे तळे बनतात. त्यामुळे सरपटणारे प्राणी नागरिकांच्या अंगणात आढळतात. कर भरूनही सुविधा देण्यास मनपाकडून कोणतीही हालचाल केली जात नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्षएनए ४७ बी, आता गुंठेवारी, असे नवनवीन फंडे आणले जात असून, सुविधा देण्याच्या नावाने मात्र बोंब आहे. पावसाळा आला की, चार महिने घर सोडून शहरात राहण्यास जाण्याची अनेक नागरिकांची इच्छा होते. मुलांना शाळेत घेऊन जाणे किंवा स्वत: दुचाकी घरापर्यंत नेणे म्हणजे कसरत वाटते.-योगेश दहीवाल, रहिवासी

रस्ता मंजूर होणार केव्हा?ड्रेनेजलाइन टाकण्यात आली; परंतु रस्त्याच्या कामाला मुहूर्त का मिळेना; असा प्रश्न भेडसावत आहे.-धनंजय पुरी, रहिवासी

घंटागाडी आणि औषध फवारणीचे काय?घंटागाडी रोज न येण्यामुळे कचरा पडून राहतो. पावसाळ्यात रस्त्यावर आणि परिसरात साचलेल्या पाण्यामुळे डासांचा त्रास सहन करावा लागतो. औषध फवारणी किमान आठवड्यातून एकदा करावी.-दीपक शर्मा, रहिवासी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका