शेतकऱ्यांना मार्केटिंगचे तंत्र कळाल्यास आर्थिक उन्नती शक्य- टोपे

By Admin | Updated: August 25, 2014 01:36 IST2014-08-25T00:25:02+5:302014-08-25T01:36:09+5:30

तीर्थपुरी : शेतकऱ्यांनी स्वत: उत्पादित केलेली फळे व भाजीपाल्यासाठीचे मार्केटिंगचे तंत्र जर कळाले तर शेतकऱ्यांची मोठी आर्थिक उन्नती होऊ शकते, असे मत पालकमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले.

If farmers learn marketing techniques, economic growth can be possible - Tope | शेतकऱ्यांना मार्केटिंगचे तंत्र कळाल्यास आर्थिक उन्नती शक्य- टोपे

शेतकऱ्यांना मार्केटिंगचे तंत्र कळाल्यास आर्थिक उन्नती शक्य- टोपे



तीर्थपुरी : शेतकऱ्यांनी स्वत: उत्पादित केलेली फळे व भाजीपाल्यासाठीचे मार्केटिंगचे तंत्र जर कळाले तर शेतकऱ्यांची मोठी आर्थिक उन्नती होऊ शकते, असे मत पालकमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले.
तीर्थपुरी येथील महाराष्ट्र राज्य कृषी पणन पुणे व मार्केट कमिटी घनसावंगीच्या वतीने उभारण्यात आलेल्या फळे व भाजीपाला आधुनिक सुविधा केंद्राच्या लोकर्पण सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
अध्यक्षस्थानी मार्केट कमिटीचे चेअरमन तात्यासाहेब उढाण, प्रमुख पाहुणे म्हणून उत्तमराव पवार, अ‍ॅड. अमरसिंह खरात, कृषी अधीक्षक रमेश गोसावी, विभागीय उप व्यवस्थापक संतोष आळसे, जिल्हा अधीक्षक रमेश घाटगे हे होते. यावेळी पालकमंत्री टोपे यांचा सत्कार तात्यासाहेब उढाण, लक्ष्मण जाधव, तुषार पवार यांनी केला. टोपे म्हणाले की, या भाजीपाला व फळे शीतकेंद्रात शेतकऱ्यांनी त्यांनी उत्पादित केलेल्या कोणत्या फळ भाजीपालाच्या मार्केटची स्थिती तेजी मंदी लक्षात घेऊन आपला माल या सुविधा केंद्रात ठेवल्यास अधिकचा भाव मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होऊ शकते. त्यासाठी तेजी मंदीचे मार्केटिंगचे तंत्र कळणे गरजेचे आहे. शेतीत अवगत असणाऱ्या तंत्रज्ञानाचा फायदा घेतला पाहिजे. शेतकऱ्यांनी एकत्र येवून शेती केल्यास अधिक फायदा होऊ शकतो. शेतकऱ्यांनी थेट फळबाग न विकता पॅकींग, ग्रेडींग, साईजींग करून विक्री केली पाहिजे. शेतकऱ्यांनी फळांना रूप बदलले पाहिजे. खरीप व रबीच्या पिकाला शेतकऱ्यांनी जोड म्हणून फळ व भाजीपाला पिकाची जोड दिल्यास शेतकरी सुखी होऊ शकतो, असे सांगितले. २५ टनाची मर्यादा असणारे हे सुविधा केंद्र आहे. यावेळी शामराव मुकणे, तात्यासाहेब चिमणे, सुर्यकांत आर्दड, गणेश आर्दड, कल्याण सपाटे, प्रकाश तांगडे, मच्छिंद्र डावकर, बी.डी. देशमुख, अरूण नादरे, विनायक घाडगे, अनिल हिवरे, सुदाम मुकणे, अंकुशराव उढाण, ज्ञानदेव मुळे, जुनेद चाऊस उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: If farmers learn marketing techniques, economic growth can be possible - Tope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.