भोकरच्या तलावाचा कारभार उमरीला तर उमरीचा भोकरला

By Admin | Updated: December 17, 2015 00:20 IST2015-12-16T23:37:38+5:302015-12-17T00:20:38+5:30

भोकर : तालुक्यातील सहा तलावांचा कारभार उमरी येथून चालत असून उमरी तालुक्यातील सात तलावांचा कारभार भोकर येथून होत आहे़ यामुळे प्रशासनाला व तलावावर सिंचन करू पाहणाऱ्या शेतकऱ्यांना ही डोकेदुखी झाली आहे़

If Bhokar pond takes charge, then Umori Bhokarna | भोकरच्या तलावाचा कारभार उमरीला तर उमरीचा भोकरला

भोकरच्या तलावाचा कारभार उमरीला तर उमरीचा भोकरला

भोकर : तालुक्यातील सहा तलावांचा कारभार उमरी येथून चालत असून उमरी तालुक्यातील सात तलावांचा कारभार भोकर येथून होत आहे़ यामुळे प्रशासनाला व तलावावर सिंचन करू पाहणाऱ्या शेतकऱ्यांना ही डोकेदुखी झाली आहे़
भोकर तालुक्यातील सुधा प्रकल्प, एक कोल्हापुरी बंधारा व सात लघु तलावांचा कारभार पाटबंधारे व्यवस्थापन उपविभाग क्रमांक १ भोकर येथून चालत होता़ बाभळी बंधाऱ्याचा कारभार पाहण्यासाठी हे कार्यालय उमरी येथे वर्ग करण्याचा शासन निर्णय १ एप्रिल २०१५ रोजी झाला़
या शासन निर्णयाची अंमलबजावणी १ डिसेंबरपासून सुरू झाली असून एक अभियंता व पाच कर्मचाऱ्यांसह हे कार्यालय उमरी येथे सुरू झाले़ या उमरीच्या नवीन कार्यालयाशी सुधा प्रकल्प, रावणगाव येथील कोल्हापुरी बंधारा व किनी, आमठाणा, कांडली, आमठाणा हे चार लघू तलाव जोडण्यात आले आहेत़ यामुळे या सहाही तलावांचा कारभार आता उमरीहून चालणार आहे़ यामुळे प्रशासनाला व शेतकऱ्यांना आता अडचण निर्माण झाली आहे़
विशेष म्हणजे भोकर शहरात असलेल्या पाटबंधारे व्यवस्थापन उपविभाग क्रमांक २ कार्यालयात उमरी तालुक्यातील सात तलाव आधीपासूनच जोडले आहेत़ खरं म्ळणजे हे सात तलाव उमरी कार्यालयाशी जोडणे आवश्यक होते़ पण हे तलाव भोकर कार्यालयाशी तसेच ठेवून भोकर तालुक्यातील सहा तलाव मात्र उमरी कार्यालयाशी जोडण्याचा अजब प्रकार झाला आहे़ विशेष म्हणजे भोकर शहराचा पाणीपुरवठा सुधा प्रकल्पातून होतो़ याच सुधा प्रकल्पाचा कारभार आता उमरीहून होणार असल्याने नगर परिषदेला आता उमरीपर्यंत चकरा माराव्या लागणार आहेत़ (वार्ताहर)

Web Title: If Bhokar pond takes charge, then Umori Bhokarna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.