भविष्यातील विजेची मागणी ओळखून कृती आराखडा
By Admin | Updated: September 26, 2014 01:19 IST2014-09-26T00:49:35+5:302014-09-26T01:19:23+5:30
अंबड/घनसावंगी : घनसावंगी विधानसभा मतदार संघातंर्गत अंबड, घनसावंगी व जालना तालुक्यात एकीकडे वीजबील वसुलीचे प्रमाण अल्प तर दुसरीकडे विजेसाठी शेतकऱ्यांकडून प्रचंड

भविष्यातील विजेची मागणी ओळखून कृती आराखडा
अंबड/घनसावंगी : घनसावंगी विधानसभा मतदार संघातंर्गत अंबड, घनसावंगी व जालना तालुक्यात एकीकडे वीजबील वसुलीचे प्रमाण अल्प तर दुसरीकडे विजेसाठी शेतकऱ्यांकडून प्रचंड मागणी असताना या विलक्षण स्थितीतून जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी व्यावहारिक मार्ग काढून विजेचा प्रश्न तडीस नेला.
३३ केव्ही उपकेंदांची क्षमता वाढविण्यासाठी घनसावंगी, कुंभार पिंपळगाव, राणीउंचेगाव, तीर्थपुरी, अंतरवाली टेंभी, रांजणी व जिरडगाव या सात ठिकाणी ५ एमव्हीए क्षमतेचे उपकेंद्र गेल्या पाच वर्षांत कायाििन्वत झाले आहे. हे सात अतिरिक्त पॉवर ट्रान्सफार्मर्स मंजुर करुन कार्यान्वित केल्याने उपकेंद्रांची क्षमता व्दिगुणित झाली. जालना तालुक्यातील ४२ गावांसाठी नविन कृषंी रोहित्र, नविन गावठान रोहित्र, सिंगल फेज, स्ट्रीट लाईट सौरउर्जा, ३३ केव्ही उपकेंद्र आदींच्या माध्यमातुन लक्षणीय काम केल्याचे समर्थक सांगतात. ८२ नविन कृषी रोहीत्र, १५ सिंगल फेज, ९ गावठान रोहीत्र, १० स्ट्रीट लाईट आदी कामे झाली. सुर्यप्रकाशावर चालणारे सौर पथदिवे बसविण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला. जालन्यातील १८ गावासाठी ५५ लाख २५ हजार तर घनसावंगीतील ८ गावांसाठी ५५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. घनसावंगी व समर्थ कारखाना साईट येथे १३२ केव्ही उपकेंद्र, देवडी हादगाव (१ कोटी ९० लाख रुपये), सिंदखेड (१ कोटी २१ लाख), शिवणगाव (१ कोटी १८ लाख), साडेगाव (१ कोटी ११ लाख), गोंदी (१ कोटी ८१ लाख), एकलहेरा (१ कोटी ११ लाख) असे एकुण ८ कोटी ३२ लाख रुपये खर्चाच्या सहा ३३ केव्ही उपकेंद्रांची निर्मिती केली. (वार्ताहर)