चांगल्या विचारांमुळे आदर्श पिढी घडते

By Admin | Updated: January 30, 2016 00:18 IST2016-01-30T00:03:31+5:302016-01-30T00:18:08+5:30

जालना : धार्मिक कार्याच्या माध्यमातून शरीराला व मनाला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होऊन या माध्यमातून सकारात्मक विचारांची पेरणी होते,

Ideal generation happens due to good thoughts | चांगल्या विचारांमुळे आदर्श पिढी घडते

चांगल्या विचारांमुळे आदर्श पिढी घडते


जालना : धार्मिक कार्याच्या माध्यमातून शरीराला व मनाला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होऊन या माध्यमातून सकारात्मक विचारांची पेरणी होते, यामुळे आजच्या पिढीवर चांगले संस्कार होत असल्याचे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केले.
चैतन्य साधक परिवारातर्फे जालना तालुक्यातील पोहेगाव येथे आयोजित गीता रामायण सत्संगप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर, संजय खोतकर, विष्णू पाचफुले, बोराडे, संदेश चव्हाण, अविनाश चव्हाण, रमेश शेळके, उध्दव पवार, विठ्ठल थोरात, परसराम तळेकर, गोविंद चव्हाण, शिवलाल राठोड, दामुनाईक चव्हाण, विष्णू चव्हाण, अशोक चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. राठोड म्हणाले की, राज्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनातर्फे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. जालना जिल्ह्यातही शेतकरी या परिस्थितीमुळे अडचणीत सापडला असल्याचे सांगत या भागात तीर्थक्षेत्र विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी आनंद चैतन्य बापू यांनी समाजात रूढी, परंपरा, अंधश्रद्धा न बाळगता व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले. सोहळ्यास अंकुश चव्हाण, प्रल्हाद चव्हाण, हारदास चव्हाण, शिवलाल बाळा राठोड, पांडू चव्हाण, बबलू चव्हाण, अंजेभाऊ चव्हाण, गणेश चव्हाण, शिवाजी चव्हाण, विलास चव्हाण, शाम चव्हाण, मुकेश चव्हाण, बबलू चव्हाण, कैलास चव्हाण, बबन चव्हाण उपस्थित होते.

Web Title: Ideal generation happens due to good thoughts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.