बीएसयुपी लाभार्थ्यांना ओळखपत्र

By Admin | Updated: July 13, 2014 00:25 IST2014-07-13T00:15:00+5:302014-07-13T00:25:29+5:30

नांदेड : बीएसयुपी घरकुल योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना बायोमेट्रीक ओळखपत्र देण्यात येणार आहेत़ यासाठी शहरातील लाभार्थ्यांची माहिती संकलीत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे़

ID card for BSUP beneficiaries | बीएसयुपी लाभार्थ्यांना ओळखपत्र

बीएसयुपी लाभार्थ्यांना ओळखपत्र

नांदेड : बीएसयुपी घरकुल योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना बायोमेट्रीक ओळखपत्र देण्यात येणार आहेत़ यासाठी शहरातील लाभार्थ्यांची माहिती संकलीत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे़
झोपडपट्टीमुक्त शहराची निर्मिती करण्यासाठी केंद्र शासनाच्या बीएसयुपी योजनेतंर्गत शहरात २७ हजार ९८५ घरे उभारण्यात येणार आहेत़ आतापर्यंत १५ हजारांवर घरकुले बांधली असून उर्वरित घरांचे कामे सुरू आहेत़ घरकुल परिसरातंर्गत १८ हजार ७६० मीटरपर्यंत सिमेंट रस्ता, ७ हजार ९०८ मीटर सिमेंट नाली, ७ हजार ६९९ मीटर लांबीची पाणीपुरवठा लाईन, ३७ हजार मीटरपर्यंत मलनि:सारण वाहिनी व पथदिवे लावणे आदी सुविधा देण्यात येत आहेत़ यासर्व सुविधेसोबतच लाभार्थ्यांच्या संपूर्ण कुटुंबाची व घरकुलाची माहिती संकलीत करून ओळखपत्रात संग्रहित केली जाणार आहे़
आधारकार्डच्या धर्तीवर घरकुल लाभार्थ्यांना बायोमेट्रीक कार्ड देण्यात येणार आहे़ कार्डावर घरकुलात राहणाऱ्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे शिक्षण, वय, जात, धर्म, व्यवसाय ही संपूर्ण माहिती संग्रहित राहणार आहे़ ओळखपत्राच्या क्रमांकावर क्लिक केल्यास संबंधित लाभार्थ्याची माहिती तात्काळ उपलब्ध होईल़
शहरात बांधून पूर्ण झालेल्या घरकुलांच्या लाभार्थ्यांची माहिती घेण्याचे काम सध्या सुरू आहे़ अपील ंसंस्थेच्या वतीने सध्या तरोडा खु़ भागातील सिद्धांतनगर, पालीनगर, तथागतनगर, बोधिसत्वनगर, याठिकाणी ओळखपत्रासाठी सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती कार्यकारी अभियंता सुग्रीव आंधारे यांनी दिली़
दरम्यान, तरोडा भागातील बीएसयुपी योजनेतंर्गत देण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत़ यामध्ये रस्ते, नाल्यांची कामे प्रामुख्याने करण्यात येत आहेत़ या कामांची पाहणी गुरूवारी कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे, उपअभियंता स्वामी यांनी केली़ (प्रतिनिधी)

Web Title: ID card for BSUP beneficiaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.