‘आयसीएमआयई २०१७’ आंतरराष्ट्रीय परिषदेला गुरुवारी सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 01:07 IST2017-09-13T01:07:15+5:302017-09-13T01:07:15+5:30
इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग (आयआयआयई) व जेएनईसी महाविद्यालय यांच्यातर्फे गुरुवारपासून (दि.१५) दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

‘आयसीएमआयई २०१७’ आंतरराष्ट्रीय परिषदेला गुरुवारी सुरुवात
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग (आयआयआयई) व जेएनईसी महाविद्यालय यांच्यातर्फे गुरुवारपासून (दि.१५) दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेचे उद्घाटन एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात दुपारी २ वाजता होणार आहे. तसेच यावेळी ‘आयआयआयई’च्या ५९ व्या वार्षिक संमेलनाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी आयआयटी रुडकीचे माजी संचालक डॉ. प्रेम विराट, ‘एसएनडीटी’ पुणेच्या कुलगुरू प्रा. शशिकला वंजारी, एमजीएमचे विश्वस्त अंकुश कदम, प्राचार्य प्रताप बोराडे, ‘आयआयआयई’चे चेअरमन दामोदर भगत, डॉ. भास्कर भांडारकर, ‘आयसीएफएआय’चे वरिष्ठ सल्लागार डॉ. आर. पी. मोहंती उपस्थित राहणार आहेत.
‘उत्पादकता विकास आणि त्यासमोरील आव्हाने’ या विषयावर आयोजित या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सुमारे १५० शोधनिबंध निवडण्यात आले आहेत. उत्पादन वाढीच्या कौशल्यामध्ये करण्यात आलेल्या सकारात्मक बदलांविषयी शहरातील नामवंत उद्योग ३० केस स्टडीज् सादर करणार आहेत. यासह परिषदेमध्ये निबंध स्पर्धा, ‘आयआयआयई’ वार्षिक सर्वसाधारण सभा यावर चर्चा होणार आहेत, अशी माहिती ‘आयआयआयई’ औरंगाबादचे चेअरमन डॉ. सुधीर देशमुख, अनुप गोयल, अरुण कुलकर्णी, अस्मिता जोशी, उपप्राचार्या डॉ. विजया मुसांडे, डॉ. एम. एस. कदम यांनी दिली.