शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

जिथे दिसशील तेथे मारून टाकेन, लिव्ह-इनमध्ये राहण्यास नकार, प्रियकराचा प्रेयसीवर शस्त्राने वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 19:58 IST

रुग्णालयात उपचार घेऊन तरुणीने पुंडलिकनगर पोलिसांकडे तक्रार केली.

छत्रपती संभाजीनगर : सततच्या वादामुळे लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणारी प्रेयसी आईकडे राहण्यास निघून गेल्याने प्रियकराने तिच्या घरी जात तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले. शिवाय, जेथे दिसशील तेथे मारून टाकेन, अशी धमकीदेखील दिली. ४ जानेवारी रोजी पुंडलिकनगर परिसरात घडलेल्या या घटनेप्रकरणी कृष्णा शेषनारायण उदावंत (२८, रा. अजिंक्यनगर, हिंदूराष्ट्र चौक) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

१८ वर्षीय तरुणीने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली. तिने तक्रारीत केलेल्या आरोपानुसार, चार वर्षांपूर्वी तिची कृष्णा उदावंतसोबत ओळख झाली होती. मैत्रीचे रूपांतर प्रेमात होत तरुणी कृष्णासोबत काही दिवसांपासून लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होती. दोन महिन्यांपूर्वी त्यांच्यात होत असलेल्या सततच्या वादाला कंटाळून संबंधित तरुणी कृष्णाला सोडून आपल्या आईकडे राहण्यास गेली. ४ जानेवारी रोजी कृष्णाने तिच्या घरी जात धिंगाणा घातल्याचा प्रकार पुढे आला. सोबत चलण्याचा हट्ट करून स्वत:च्या गळ्यावर शस्त्र ठेवून आत्महत्या करण्याची धमकी ४ जानेवारी रोजी दिली. त्यानंतरही तरुणीने सोबत जाण्यास नकार देताच त्याच शस्त्राने तिच्या हातावरसुद्धा वार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शिवाय, बाहेर जिथे भेटशील तेथे मारून टाकेन, अशी धमकी देत पसार झाला. रुग्णालयात उपचार घेऊन तरुणीने पुंडलिकनगर पोलिसांकडे तक्रार केली. अंमलदार केशव कसारे अधिक तपास करत आहेत.

आत्महत्या करण्याची दिली धमकीरविवारी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान कृष्णा उदावंतने तक्रारदार तरुणीचे घर गाठून सोबत चल असा हट्ट धरला होता. परंतु, तिने सोबत येण्यास नकार दिल्याने कृष्णाने स्वत:च्या गळ्यावर शस्त्र ठेवून आत्महत्या करण्याची धमकी दिली. यानंतर तरुणीच्या हातावर वार करून तो पसार झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

शाळेत असतानाच पडली प्रेमाततक्रारदार तरुणीची शाळेत असताना कृष्णासोबत ओळख झाली होती. तेव्हाच ती त्याच्या प्रेमात पडली. त्याच्यासोबत राहत असताना तिने एका ग्रामीण भागातील महाविद्यालयात अकरावी, बारावीसाठी प्रवेश घेतला. त्याच दरम्यान तरुणी कृ़ष्णासोबत त्याच्या अजिंक्यनगरच्या घरी राहण्यास गेली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Lover Attacks Girlfriend for Refusing Live-in Relationship, Threatens to Kill

Web Summary : A man attacked his girlfriend with a weapon after she refused to continue their live-in relationship and threatened to kill her. The incident occurred in Chhatrapati Sambhajinagar after arguments led the woman to leave. Police have registered a case against the accused.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर