‘सुना था के वो आयेंगे अंजुमन में...’

By Admin | Updated: September 13, 2014 00:35 IST2014-09-13T00:32:55+5:302014-09-13T00:35:33+5:30

औरंगाबाद : ‘सुना था के वो आयेंगे अंजुमन में, सुना था के उनसे मुलाकात होगी...

'I heard that he will come in Anjuman ...' | ‘सुना था के वो आयेंगे अंजुमन में...’

‘सुना था के वो आयेंगे अंजुमन में...’

औरंगाबाद : ‘सुना था के वो आयेंगे अंजुमन में, सुना था के उनसे मुलाकात होगी...
हमें क्या खबर थी, हमें क्या पता था, न ये बात होगी, न वो बात होगी’
तरल शब्दकळेतून ‘या हृदयीचे त्या हृदयी’ पोहोचविणारा एक प्रतिभावंत कलंदर शहरात येणार म्हणून त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या काव्यप्रेमींची अवस्था सध्या काहीशी अशी झाली आहे.
प्रख्यात कवी, गीतकार गुलजार यांनी लिहिलेल्या ‘मिर्झा गालिब’ या पुस्तकाचा अनुवाद येत्या शनिवारी (१३ सप्टेंबर) प्रकाशित होणार होता.
याच वेळी त्यांची प्रकट मुलाखतही होणार होती. मात्र, अचानक गुलजार यांना आलेल्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला असल्याची माहिती संयोजक डॉ. सुभाष देवढे-पाटील यांनी दिली.
मात्र, ‘मी बरा झालो की शहरातील रसिकांना भेटण्यास निश्चित येईन,’ असे गुलजार यांनी आपल्या चाहत्यांना कळविले आहे. त्यामुळे त्यांच्याच शब्दात सांगायचे तर ‘अभी न परदा गिराओ, ठहरो, की दास्ताँ आगे और भी है...!’

Web Title: 'I heard that he will come in Anjuman ...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.