शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

शांतीगिरींना यापूर्वी पराभवाची धूळ चारली आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:57 AM

शांतीगिरी महाराजांना आपण याआधी एकदा निवडणुकीत पराभवाची धूळ चारली आहे. यामुळे त्यांनी धर्माची मानहानी होईल असे वर्तन करू नये, असा सल्ला खा. चंद्रकांत खैरे यांनी शांतीगिरी महाराजांना सोमवारी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शांतीगिरी महाराजांना आपण याआधी एकदा निवडणुकीत पराभवाची धूळ चारली आहे. यामुळे त्यांनी धर्माची मानहानी होईल असे वर्तन करू नये, असा सल्ला खा. चंद्रकांत खैरे यांनी शांतीगिरी महाराजांना सोमवारी दिला. ते लोकमत प्रतिनिधीशी शांतीगिरी महाराजांच्या लोकसभेच्या संभाव्य उमेदवारीबद्दल बोलत होते. त्यांच्याबाबत खूप काही बोलण्याची गरज वाटत नसल्याचेही खैरे यांनी स्पष्ट केले.शांतीगिरी महाराजांनी स्वत:च आगामी लोकसभा निवडणूक भाजपकडून लढणार असल्याचे जाहीर केल्यानंतर भाजपमध्ये इच्छुक असलेल्या १० ते १२ जणांवर ‘जय बाबाजी’ करण्याची वेळ आली आहे. गेल्या महिन्यात शांतीगिरी महाराजांची महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट घेऊन स्नेहभोजन घेतले होते. त्यामुळे त्यांना निवडणुकीचे वेध लागले आहेत. जर भाजपने त्यांना उमेदवारी दिली नाहीतरी ते मैदानात येणार आहेत. भाजपचे मंत्री पाटील यांनी महाराजांची भेट घेऊन चूक तर केली नाही ना, असे भाजपच्या गोटात वाटू लागले आहे. औरंगाबादमधून भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढविण्याचे सूचक वक्तव्य केल्यानंतर रविवारी शांतीगिरी हे एनजीओच्या मेळाव्यात मार्गदर्शनासाठी आले होते.मेळाव्यात महाराजांची उपस्थिती व त्यांच्या निवडणूक लढविण्याच्या मनसुब्याबाबत खा. खैरे म्हणाले, शांतीगिरी महाराजांना आपण याआधी एकदा निवडणुकीत पराभवाची धूळ चारली आहे. यामुळे त्यांनी धर्माची मानहानी होईल असे वर्तन करू नये. तसेच काल झालेला एनजीओचा मेळावा हे शासकीय व्यासपीठ असेल तर तेथे महाराजांना का बोलावले. त्यांची कोणती एनजीओ आहे. याबाबत विभागीय आयुक्तांना जाब विचारू, असेही खा. खैरे म्हणाले.गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरुन जिल्ह्यातील वातावरण तापले आहे. सद्यस्थितीवरुन शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षात लोकसभा निवडणुकीसाठी युती होणार नाही, असेच वातावरण दिसत आहे. युती होणार नसल्याची शक्यता गृहित धरुनच विविध विधाने समोर येत आहेत.२००९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपचे उमेदवार असलेले खैरे यांना शांतीगिरी महाराजांनी जेरीस आणले होते. दीड लाखांच्या आसपास भक्त परिवाराची मते शांतीगिरी महाराजांनी मिळविली होती, त्यामुळे खैरेंचे मताधिक्य घटले. सोबत काँग्रेसच्या उमेदवाराचाही पराभव झाला होता. २०१९ च्या संभाव्य लोकसभा निवडणूक मैदानात शांतीगिरी महाराज उतरणार आहेत.भाजपने उमेदवारी दिली नाहीतर अपक्ष लढण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे. शांतीगिरी महाराजांना निवडणूक रिंगणात उतरविण्यामागे भाजप मतांच्या बेरजेचे राजकारण करण्याच्या विचारात असण्याची शक्यता आहे. महाराजांना अपक्ष लढविण्यासाठीच भाजपची तयारी असल्याचे दिसते.