शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

‘तू छोट्या जातीची असल्यामुळे लग्न करू शकत नाही’; धक्क्याने अभियंता तरुणीने संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 12:54 IST

पाच वर्षे ‘रिलेशन’मध्ये राहिल्यानंतर जातीमुळे लग्नास नकार : प्रियकरासह त्याच्या भावाविरोधात गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : महाविद्यालयात शिक्षण घेताना मैत्रिणीच्या मानलेल्या भावासोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्री अन् नंतर प्रेमात झाले. आरोपीने ५ वर्षे लग्नाचे आमिष दाखवून वारंवार संबंध ठेवले. प्रेयसीने लग्नाचा तगादा लावल्यावर प्रियकराने ‘तू छोट्या जातीची असल्यामुळे लग्न करू शकत नाही,’ असे सांगितले. या धक्क्यामुळे खच्चीकरण झालेल्या आयटी अभियंता तरुणीने ३० मार्च रोजी विष प्राशन केले. उपचार सुरू असताना, तिचा शनिवारी मृत्यू झाला. या प्रकरणी प्रियकरासह त्याच्या भावाविरोधात बेगमपुरा पोलिसांनी अत्याचारासह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविला.

पंकज गणेश रावळकर (रा.एन-२, जय भवानीनगर) व त्याचा भाऊ आशिष रावळकर अशी आरोपींची नावे आहेत. मृत तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पीडिता महाविद्यालयात आयटीचे शिक्षण घेत असताना, तिच्या मैत्रिणीचा मानलेला भाऊ पंकजसोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्री व नंतर प्रेमात झाले. तरुणीला पंकजने स्वत:ला नोकरी लागली की, लग्न करणार असल्याचे सांगितले. त्यातून त्याने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ही बाब तरुणीने तिच्या आई-वडिलांनाही सांगितली. या मैत्रीचा गैरफायदा घेत, पंकजने २०१९ मध्येच शहरातील विविध भागांत नेऊन तरुणीवर अत्याचार केले. दरम्यान, तरुणीला पुण्याला मोठ्या आयटी कंपनीत नोकरी लागली. पुण्यात पंकजही तिच्यासोबत फ्लॅटवर राहू लागला. त्या ठिकाणचा संपूर्ण खर्च तरुणीच देत होती. बदनामीची भीती दाखवून तो तिच्याकडून पैसेही उकळत होता. 

शेवटी तरुणीने पुणे सोडून छत्रपती संभाजीनगर गाठत पंकजकडे लग्नाचा तगादा लावला, तेव्हा त्याने ‘तुम्ही छोट्या जातीचे असल्यामुळे लग्न करता येणार नाही,’ असे सांगितले. या धक्क्यामुळे तरुणी खचली. त्यातूनच तिने गावी जाऊन ३० मार्चला विष घेतले. खासगी रुग्णालयात तिचा ६ रोजी मृत्यू झाला. या प्रकरणी तरुणीच्या वडिलांनी बेगमपुरा ठाण्यात तक्रार नोंदविली. मात्र, घटनास्थळ सिल्लेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्यामुळे त्या ठिकाणी पोलिसांनी गुन्हा वर्ग केला आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी