तांत्रिक अडचणींमुळे हैदराबाद विमान अर्ध्यातून गेले परत

By | Updated: November 28, 2020 04:11 IST2020-11-28T04:11:59+5:302020-11-28T04:11:59+5:30

\Sऔरंगाबाद : तांत्रिक अडचणीमुळे औरंगाबादला येणारे इंडिगोचे विमान शुक्रवारी अर्ध्या प्रवासातून हैदराबादला परतले. हे विमान सायंकाळी औरंगाबादेत आले. हे ...

The Hyderabad flight went halfway back due to technical difficulties | तांत्रिक अडचणींमुळे हैदराबाद विमान अर्ध्यातून गेले परत

तांत्रिक अडचणींमुळे हैदराबाद विमान अर्ध्यातून गेले परत

\Sऔरंगाबाद : तांत्रिक अडचणीमुळे औरंगाबादला येणारे इंडिगोचे विमान शुक्रवारी अर्ध्या प्रवासातून हैदराबादला परतले. हे विमान सायंकाळी औरंगाबादेत आले.

हे विमान औरंगाबादला दुपारी दीड वाजेच्या सुमारास येणार होते. नियोजित वेळेनुसार विमानाने उड्डाण घेतले; परंतु औरंगाबाद काही अंतरावर असतानाच विमान पुन्हा हैदराबादकडे नेण्यात आले. औरंगाबादहून हैदराबादला जाण्यासाठी विमानतळावर प्रवासी थांबले होते. हे विमान पुन्हा सायंकाळी साडेपाचला औरंगाबाद विमानतळावर उतरले, अशी माहिती विमानतळाच्या सूत्रांनी दिली. या सगळ्यात येणाऱ्या- जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली. त्याचबरोबर हैदराबादला जाणारे प्रवासी विमानतळावर सुमारे साडेतीन तास ताटकळले होते.

Web Title: The Hyderabad flight went halfway back due to technical difficulties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.