हुतात्मा पानसरे स्मारक दुरुस्तीसाठी १० लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:55 IST2017-09-12T00:55:08+5:302017-09-12T00:55:08+5:30
तालुक्यातील अर्जापूर येथील हुतात्मा गोविंदराव पानसरे यांच्या स्मारकाच्या दुरुस्तीसाठी राज्य शासनाने १० लाखांचा निधी मंजूर केला आहे. हुतात्मा गोविंदराव पानसरे हे मराठवाडा मुक्तिसंग्रामात पहिले बळी ठरले.

हुतात्मा पानसरे स्मारक दुरुस्तीसाठी १० लाख
राजेश गंगमवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बिलोली :तालुक्यातील अर्जापूर येथील हुतात्मा गोविंदराव पानसरे यांच्या स्मारकाच्या दुरुस्तीसाठी राज्य शासनाने १० लाखांचा निधी मंजूर केला आहे. हुतात्मा गोविंदराव पानसरे हे मराठवाडा मुक्तिसंग्रामात पहिले बळी ठरले.
१७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाच्या राजवटीतून मराठवाडा मुक्त झाला़ भारतीय स्वातंत्र्याच्या १३ महिन्यानंतर मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले़ येत्या १७ सप्टेंबर रोजी ६९ वा मराठवाडा मुक्तिदिन आहे़ मराठवाडा मुक्तीसाठी गोविंदराव पानसरे यांचा पहिला बळी गेल्याची नोंद इतिहासात आहे़ वयाच्या ३३ व्या वर्षी पानसरे यांची अर्जापूर भागात हत्या झाली. २१ आॅक्टोबर १९४६ रोजी बिलोलीच्या न्यायालयातून धर्माबादकडे जात असताना रजाकाराच्या जुलमी सत्ताधाºयांनी त्यांची हत्या केली. त्यांच्या बलिदानाचे स्मरण व्हावे म्हणून १९८४ मध्ये अर्जापूर येथे स्मारक उभारण्यात आले़ याशिवाय धर्माबाद शहरातही असे स्मारक उभारण्यात आले़ स्मारकाच्या देखभालीसाठी कोणताही निधी नसल्यामुळे स्मारक अडगळीत पडून त्याची प्रचंड दुरवस्था झाली़ स्मारक देखावेच बनले़ स्मारक पानसरे महाविद्यालयाच्या परिसरात असल्याने महाविद्यालयीन व्यवस्थापनाने या परिसरात