पतीची आत्महत्या; प्रियकरासह महिलेला अटक
By Admin | Updated: August 2, 2016 00:26 IST2016-08-02T00:20:43+5:302016-08-02T00:26:40+5:30
औरंगाबाद : परपुरुषासोबत राहणाऱ्या पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून तरुणाने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

पतीची आत्महत्या; प्रियकरासह महिलेला अटक
औरंगाबाद : परपुरुषासोबत राहणाऱ्या पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून तरुणाने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी मृताची पत्नी आणि तिच्या प्रियकरास अटक केली.
ज्योती रवी कुचेकर (२२) आणि श्याम रोकडे (४६,रा. राजनगर, मुकुंदवाडी) अशी आरोपींची नावे आहेत. याविषयी पोलीस उपनिरीक्षक नईम पठाण यांनी सांगितले की, मुकुंदवाडी येथील रहिवासी रवी कुचेकर या तरुणाने ३० मे रोजी रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली होती.
तपासादरम्यान मृताची पत्नी ज्योती ही श्यामच्या राजनगर येथील घरी राहण्यासाठी गेली होती. तिला दोन मुले आहेत. आपल्या पतीस दारू चे व्यसन असून तो घरखर्चाला पैसेही देत नसल्याचे कारण तिने तिच्या प्रियकरास सांगितले होते. दोघेही पती-पत्नीसारखे राहत होते. ही बाब रवी यास समजल्यानंतर तो त्यांच्याकडे जाब विचारण्यासाठी गेला होता. त्यावेळी दोघांनी त्याला शिवीगाळ करून धक्काबुक्की केली होती. त्यांच्या त्रासाला कंटाळून रवीने आत्महत्या केल्याचे तपासात उघड झाले.