पत्नीने प्राण सोडताच पतीचा पोबारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2016 00:25 IST2016-11-17T00:25:44+5:302016-11-17T00:25:01+5:30

बीड : माजलगाव तालुक्यातील वारोळा तांडा येथील एका विवाहितेला विषारी द्रव पोटात गेल्यामुळे पतीने बुधवारी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

The husband's husband, when he left his life, | पत्नीने प्राण सोडताच पतीचा पोबारा

पत्नीने प्राण सोडताच पतीचा पोबारा

बीड : माजलगाव तालुक्यातील वारोळा तांडा येथील एका विवाहितेला विषारी द्रव पोटात गेल्यामुळे पतीने बुधवारी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, दुर्दैवाने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर पती तेथून फरार झाला. नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.
सविता पिनाजी राठोड (वय २८, रा. वारोळा तांडा) असे मयत विवाहितेचे नाव आहे. सात वर्षांपूर्वी तिचा विवाह झाला होता. पती पिनाजी राठोड हा वाहन चालक असून, तो सध्या पुण्यात वास्तव्यास आहे. पत्नीसोबत गेल्या काही वर्षांपासून त्याचे पटत नव्हते. दोन मुली व एका मुलाचा सांभाळ सविता गावी राहून करीत होती. नातेवाईकांच्या कार्यक्रमासाठी पिनाजी राठोड गावी आला होता.
बुधवारी त्याने पत्नीसोबत वाद घालत तिला विषारी द्रव पाजल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. सायंकाळी त्याने पत्नीला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्यानंतर तो गायब झाला. त्यामुळे नातेवाईकांचा त्याच्यावरील संशय वाढला आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता. (प्रतिनिधी)

Web Title: The husband's husband, when he left his life,