शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

पतीला पाच वर्षांची सक्तमजुरी

By admin | Updated: January 20, 2015 01:28 IST

औरंगाबाद : भास्कर मोरे (२९, रा. बोलटेक, ता. कन्नड) याच्या हातून पत्नी कविता मोरेचा भांडणामध्ये खून झाला होता. प्रकरण न्यायालयात सुनावणीसाठी आल्यानंतर

औरंगाबाद : भास्कर मोरे (२९, रा. बोलटेक, ता. कन्नड) याच्या हातून पत्नी कविता मोरेचा भांडणामध्ये खून झाला होता. प्रकरण न्यायालयात सुनावणीसाठी आल्यानंतर जिल्हा सत्र न्यायाधीश एस. एम. कोल्हे यांनी आरोपीला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.१९ सप्टेंबर २०१३ रोजी भास्कर मोरे आणि पत्नी कविता मोरे (२२) यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाले. त्यामध्ये भास्करने कविताला फुकणीने छातीवर मारले. त्यामुळे कविता जखमी होऊन बेशुद्ध पडली. त्यानंतर भास्करने शेजारी राहणाऱ्या शीलाबाई रमेश गायकवाड यांना कविता उलट्या होऊन बेशुद्ध पडल्याचे सांगितले. शीलाबार्इंनी कविताला दवाखान्यात नेण्यासाठी मदत केली. कन्नड उपजिल्हा रुग्णालयात कविताला दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी कन्नडचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक प्रमोद दत्तात्रय भातनाते यांनी सरकार पक्षातर्फे भास्कर मोरेविरुद्ध कन्नड पोलीस ठाण्यात ३०२ चा गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान कविताच्या डाव्या बाजूच्या छातीच्या ५ आणि ७ नंबरची फासळी मोडल्याने रक्तस्राव होऊन तिचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. प्रकरण न्यायालयात सुनावणीसाठी आल्यानंतर सहायक सरकारी वकील सुदेश शिरसाट यांनी नऊ साक्षीदार तपासले. त्यामध्ये फौजदार भातनाते, डॉ. गीते, डॉ. दाभाडे आणि शीलाबाई यांची साक्ष झाली. उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला ३०२ मधून मुक्त करून ४०२ (२) नुसार सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात भास्कर मोरेला पाच वर्षांची सक्तमजुरी आणि पाचशे रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास एक महिना सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.