प्रियकराच्या मदतीने पतीचा खून

By Admin | Updated: June 14, 2017 00:31 IST2017-06-14T00:29:48+5:302017-06-14T00:31:25+5:30

जालना : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली

Husband's blood with the help of a boyfriend | प्रियकराच्या मदतीने पतीचा खून

प्रियकराच्या मदतीने पतीचा खून

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तालुका पोलिसांनी खुनाच्या कटात सहभाग असलेल्या पत्नीस मंगळवारी अटक केली.
अंबड येथील जुगलकिशोर रतनलाल लोहिया (४५) हे १७ एप्रिल २०१७ रोजी जालना न्यायालयात तारखेसाठी आले होते. ते घरी न पोहोचल्यामुळे भाऊ संतोषकुमार लोहिया यांनी तालुका ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली. महिना उलटूनही जुगलकिशोर यांचा शोध लागला नाही. दरम्यान, त्यांचे अपहरण झाल्याची फिर्याद संतोषकुमार यांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी अंबड येथील एका संशयितास अटक केली. चौकशीनंतर न्यायालयाने त्यास जामीन मंजूर केला. दरम्यान, पोलिसांनी जुगलकिशोरची पत्नी पूनम उर्फ कुसुम (३२) हिला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत तिने प्रियकराकरवी पतीचे अपहरण करून खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी पूनमला खुनाचा कट रचल्याप्रकरणात अटक करून मंगळवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिला गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी दिली. दरम्यान, अपहरणाच्या गुन्ह्यात जामिनावर असलेल्या पूनमच्या प्रियकरास पुन्हा ताब्यात घेण्यात येईल. त्याने जुगलकिशोर यांचा खून कुठे, कधी, कशा पद्धतीने केला, मृतदेहाची विल्हेवाट कशी लावली याबाबत पुढील चौकशी करणार असल्याचे त्रिभुवन यांनी स्पष्ट केले.

Web Title: Husband's blood with the help of a boyfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.