शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

नवस बोलो म्हणून दूर राहायचा, समलैंगिकतेचे गुपित उघड होताच पतीचा पत्नीवर खुनी हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 12:22 IST

तणावाखाली गेलेल्या तरुणीची पोलिसांकडे धाव, पतीसह सासरच्यांवर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : मुलगा समलैंगिक असल्याचे माहिती असतानाही कुटुंबाने त्याचे लग्न लावले. मुलीच्या वडिलांकडून लाखोंचे सोने, रोख रक्कम हुंडा म्हणून स्वीकारला. लग्नानंतर पती समलैंगिक असल्याचे समजल्यानंतर मुलीने सासरच्यांकडे तक्रार केली. मात्र, पतीसह सासरच्यांनी तिला मारहाण करत अतोनात छळ करून माहेरी पाठवले. या प्रकारामुळे तणावाखाली गेलेल्या तरुणीने पोलिसांकडे तक्रार केली. त्यावरून छावणी ठाण्यात नाशिक जिल्ह्यातील अंदरसुल येथील गणेश नावाच्या तरुणासह त्याच्या संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आला.

३२ वर्षीय तरुणीचा मे २०२५ मध्ये गणेशसोबत विवाह झाला होता. लग्नानंतर मात्र गणेशने देवाला नवस बोलल्याचे कारण देत तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला. त्यानंतर गणेशने तिच्याशी संवाद बंद केला. तरुणीने सातत्याने त्याच्याशी मोकळेपणाने बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने नकार दिला. तिने वैद्यकीय उपचारांचा पर्याय देखील दिला. मात्र, मुलीला मुलाच्या समलैंगिक असल्याबाबत संशय आल्याचे कळाल्यानंतर सासरच्यांनी तिच्यावर विविध संशय घेत छळ सुरू केला.

तरुणीलाच १५ लाखांची मागणीपतीकडून सांसारिक सुख हवे असल्यास तू वडिलांकडून १५ लाख रुपये घेऊन ये, अशी अट ठेवत मारहाण सुरू केली. तरुणीने हा प्रकार भावाला सांगितला. तेव्हा भावाने तिच्या पतीसोबत बोलण्याचा प्रयत्न करून वैद्यकीय उपचारांचा पर्याय ठेवला. मात्र, तरुणीच्या पतीने त्यालाच मारहाण केली. तरुणीची शैक्षणिक कागदपत्रे, दागिने ताब्यात घेतले.

तक्रार न करण्यासाठी विनवण्या९ सप्टेंबर २०२५ रोजी पुन्हा तरुणीला गणेशने मारहाण केली. यामुळे तिने पोलिसांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला. तेव्हा गणेशच्या कुटुंबाने सामोपचाराने मिटवण्यासाठी विनवण्या केल्या. त्याच्या काही दिवसांतच त्याचे अमर नावाच्या मित्रासोबत समलैंगिक संबंध असल्याचे उघड झाले. २२ नोव्हेंबर २०२५ रोजी तो कायम तरुणीच्या अनुपस्थितीत घरी येत असल्याचे तरुणीला समजले. तेव्हा तरुणीने तीव्र आक्षेप नोंदवल्याने वाद वाढले व गणेशने तिला बेदम मारहाण करून खोलीत डांबून दुसऱ्या दिवशी सकाळी माहेरी पाठवून दिले. माहेरी आलेली तरुणी दोन महिने तणावाखाली होती. त्यानंतर तिने छावणी पेालिसांकडे तक्रार दिली. त्यावरून २१ जानेवारी रोजी गणेशसह त्याच्या कुटुंबावर फसवणूक, कौटुंबिक छळ, मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

English
हिंदी सारांश
Web Title : Husband attacks wife after homosexuality secret revealed; Dowry harassment alleged.

Web Summary : A man hid his homosexuality, married for dowry, then abused his wife. She faced harassment when she complained. Police have filed charges against the husband and his family for fraud and domestic abuse.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी