पत्नीच्या मृत्यूचे दु:ख अनावर झाल्याने पतीची आत्महत्या

By Admin | Updated: October 29, 2015 00:22 IST2015-10-29T00:08:12+5:302015-10-29T00:22:54+5:30

माजलगाव : तालुक्यातील चिंचगव्हाण येथे पत्नीच्या निधनाचे दु:ख अनावर झाल्याने पतीने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी घडली.

Husband suicides due to wife's death | पत्नीच्या मृत्यूचे दु:ख अनावर झाल्याने पतीची आत्महत्या

पत्नीच्या मृत्यूचे दु:ख अनावर झाल्याने पतीची आत्महत्या


माजलगाव : तालुक्यातील चिंचगव्हाण येथे पत्नीच्या निधनाचे दु:ख अनावर झाल्याने पतीने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी घडली.
चिंचगव्हाण येथील रहिवाशी सारंग बाबूराव परसोडे (वय ३२) या तरूणाच्या पत्नीचे गेल्या आठवड्यात आजाराने निधन झाले. याचा मानसिक धक्का सारंगला बसल्याने तो वैफल्यग्रस्त झाला होता. यातुनच सारंगने रविवारी विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपवली. त्याचे प्रेत माजलगाव धरणाच्या पूर्वेला असलेल्या सा.बां.विभागाच्या यांत्रिकी कार्यशाळेजवळ आढळून आले. मयताचा भाऊ सुखदेव बाबूराव परसोडे यांच्या माहितीवरून माजलगाव शहर ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Husband suicides due to wife's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.