भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा
By Admin | Updated: June 4, 2017 00:40 IST2017-06-04T00:38:23+5:302017-06-04T00:40:57+5:30
वाळूज महानगर : चारित्र्यावर संशय घेणाऱ्या मद्यपी पतीच्या त्रासास कंटाळलेल्या पत्नीने टोकाचे पाऊल उचलले.

भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा
लोकमत न्यूज नेटवर्क वाळूज महानगर : चारित्र्यावर संशय घेणाऱ्या मद्यपी पतीच्या त्रासास कंटाळलेल्या पत्नीने टोकाचे पाऊल उचलले. आपल्या दोन भावांच्या मदतीने पतीचा काटा काढल्याची खळबळजनक घटना वाळूज एमआयडीसी परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथे शनिवारी (दि.३) उघडकीस आली. पत्नीने पतीच्या डोळ्यात मिरची पूड टाकली तर तिच्या दोघा भावांनी लोखंडी गजाने बेदम मारहाण केली. त्यात गंभीर जखमी झालेल्या पतीचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. भगवान बापूराव तांगडे (३५, रा. पीरसावंगी, ता. बदनापूर, जि.जालना) हा वाहनचालक असून, गेल्या काही दिवसांपासून पत्नी ज्योती व दोन मुलांसोबत रांजणगाव शेणपुंजी येथील आसारामबापूनगरात वास्तव्यास होता. भगवान यास दारूचे व्यसन असल्यामुळे त्याची पत्नीसोबत कायम वादावादी होत असे. कुटुंबाची ओढाताण होत असल्यामुळे ज्योती बांधकामावर मजुरीने जात होती. वाहनचालक भगवान दारूच्या नशेत कायम शिवीगाळ करून मारहाण करीत असल्यामुळे ज्योतीने या प्रकाराची माहिती माहेरच्या मंडळींना दिली होती. संसारात वादविवाद होत असल्यामुळे समजूतदारपणाची भूमिका घ्यावी, असे सांगून माहेरच्या मंडळींनी ज्योती हिची समजूत काढली होती. मात्र दारूच्या व्यसनात गुरफटलेला भगवान तांगडे सतत छळत असल्यामुळे पत्नी ज्योती कंटाळली होती. पत्नी व तिच्या भावांनी केली मारहाण १ जून रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास भगवान हा मद्य प्राशन करून घरी आला व पत्नीसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे ज्योतीने तिचे भाऊ योगेश कोलते (२४) व प्रल्हाद कोलते (१९ , दोघे रा. बजाजनगर) यांना रांजणगावात बोलावून घेतले. रात्री या तिघांनी भगवान तांगडे यास बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीमुळे (पान ७ वर)