पती-पत्नीला तरुणाची जबर मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:04 IST2021-05-30T04:04:06+5:302021-05-30T04:04:06+5:30

गणेश रामभाऊ खुर्दे (३८ रा.काचीपुरा, झोपडपट्टी) येथे कुटुंबास वास्तव्यास आहे. शुक्रवार दुपारी ४ वाजताच्या सुमारास गणेशच्या शेजारी राहणारा नागेश ...

Husband and wife beaten by a young man | पती-पत्नीला तरुणाची जबर मारहाण

पती-पत्नीला तरुणाची जबर मारहाण

गणेश रामभाऊ खुर्दे (३८ रा.काचीपुरा, झोपडपट्टी) येथे कुटुंबास वास्तव्यास आहे. शुक्रवार दुपारी ४ वाजताच्या सुमारास गणेशच्या शेजारी राहणारा नागेश गायकवाड हा गणेशची मावशी कमल पिंपळे, भावजई नंदा पिंपळे व बहिणी जया शिल्लोडे यांना शिवीगाळ करीत होता. गणेश खुर्दे हे त्यास समजाविण्यासाठी गेले असता नागेशने शिवीगाळ करून मारहाण केली. या भांडणात नागेश याने घरातून कुऱ्हाड आणत गणेश खुर्दे यांच्या डोक्यात पाठीवर कुऱ्हाडीने घाव घालून जखमी केले. पतीला मारहाण होत असल्याने गणेशची पत्नी सीता भांडण सोडविण्यासाठी गेल्या असता नागेशने तिच्या खांद्यावर वार करून त्यांना जखमी केले. या दोघा पती-पत्नीला मारहाण होत असल्याने त्यांचे नातेवाईक कमलबाई पिंपळे, भावजयी नंदा पिंपळे व बहीण जया शिल्लोडे या मध्यस्थीसाठी गेल्या असता नागेश याने त्यांनाही धक्काबुक्की केली. या मारहाणप्रकरणी गणेश खुर्दे यांच्या तक्रारीवरुन नागेश गायकवाड याच्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Husband and wife beaten by a young man