बनावट दस्ताऐवजाद्वारे गारपीट अनुदान लाटले
By Admin | Updated: June 30, 2014 00:37 IST2014-06-30T00:25:27+5:302014-06-30T00:37:04+5:30
वडवणी: तालुक्यातील देवडी येथे बनावट दस्ताऐवज वापरुन गारपिटीचे हजारोंचे अनुदान लाटण्यात आले़

बनावट दस्ताऐवजाद्वारे गारपीट अनुदान लाटले
वडवणी: तालुक्यातील देवडी येथे बनावट दस्ताऐवज वापरुन गारपिटीचे हजारोंचे अनुदान लाटण्यात आले़ याप्रकरणी वडवणी ठाण्यात तलाठ्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे़
देवडीचे तलाठी विलास बळराम उबाळे (रा़ बीड) खाजगी मदतनीस भाऊसाहेब श्रीहरी देशमुख, धनराज श्रीहरी देशमुख, रमाबाई श्रीहरी देशमुख, गणेश दिगंबर देशमुख, मंदा धनराज देशमुख, मनीषा गणेश देशमुख (सर्व रा़ पिंपरखेड ता़ वडवणी) यांचा आरोपींत समावेश आहे़ या सर्वांनी वेगवेगळ्या गट क्रमांकांतील जमिनीच्या बनावट सातबारा तयार करुन गारपीटग्रस्तांसाठी आलेल्या अनुदानापैकी ५७ हजार रुपये खोटे पंचानामे दाखवून लाटले़ फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर देवडीचे शेतकरी बाबासाहेब सिताराम कोल्हे यांनी न्यायायलयात धाव घेतली़ न्यायालयाच्या आदेशाने शनिवारी गुन्हा नोंद करण्यात आला़ (वार्ताहर)