वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे नुकसान
By Admin | Updated: May 16, 2016 23:51 IST2016-05-16T23:49:16+5:302016-05-16T23:51:46+5:30
तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील सावरगाव शिवारात शुक्रवारी दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस झाला़ या सुसाट वाऱ्यामुळे या भागातील एका शेतकऱ्याच्या

वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे नुकसान
तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील सावरगाव शिवारात शुक्रवारी दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस झाला़ या सुसाट वाऱ्यामुळे या भागातील एका शेतकऱ्याच्या पॉलीहाऊसवरील प्लॅस्टिक जाळी फाटून ५० हजाराचे नुकसान झाले. तर इतर अनेक शेतकऱ्यांच्या गोठ्यांचे शेड उडून त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे़
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव, केमवाडी रस्त्यावर सावरगाव शिवारात महादेव गुरुलिंग कुंभार यांनी एकात्मिक फलोद्यान विकास अभियानांतर्गत हरीतगृह उभारणी २०१५-१६ मध्ये केली. त्यासाठी २०१६ चौरस मिटर क्षेत्रात पॉलीहाऊसच्या उभारणीनंतर त्यात जरबेरा आर्कीड जातीचा रंगीबेरंगी फुलाची लागवड करुन उत्पादन घेण्यास सुरुवात केली. यासाठी २४ लाख रुपये खर्च करण्यात आले. शुक्रवारी दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या दरम्यान अचानक वादळी वारे व पावसास सुरुवात झाली. वादळी वारे पॉलीहाऊसमध्ये शिरल्याने पॉलीहाऊसमधील प्लॅस्टिक कागद जाळी फाटून ५० हजाराचे नुकसान झाले. तर याच वाऱ्यामुळे संजय कुंभार यांच्या शेतातील पत्र्याचे शेड मोडून नुकसान झाले. शिवाय इतर शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे़ तरी संबंधित शेतकऱ्यांना प्रशासनाने मदत मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे.