गारपीटग्रस्तांच्या मुुला- मुलींचा सामुदायिक विवाह सोहळा
By Admin | Updated: May 9, 2014 00:16 IST2014-05-09T00:15:06+5:302014-05-09T00:16:27+5:30
अंबाजोगाई: गारपिटीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा येथे मोठ्या थाटात पार पडला.

गारपीटग्रस्तांच्या मुुला- मुलींचा सामुदायिक विवाह सोहळा
अंबाजोगाई: गारपिटीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी रोटरी क्लब आॅफ तळेगाव दाभाडे व शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने गुरूवारी १३ जोडप्यांचा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा येथे मोठ्या थाटात पार पडला. अंबाजोगाई व परिसरात दीड महिन्यापूर्वी झालेल्या गारपीट व वादळी पावसामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्यांपुढे आपल्या मुला-मुलींचे विवाह कसे करायचे? हा प्रश्न होता. ही गरज ओळखून सर्वधर्मीय सामुदायिक सोहळा घेण्याचा निर्णय झाला. या विवाह सोहळ्यात ११ हिंदू जोडपी विवाहबद्ध झाली. या जोडप्यांना गॅस कनेक्शनसह संसारोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. या विवाह सोहळ्यास १० हजारांपेक्षाही जास्त वºहाडी सहभागी झाले होते. यावेळी डॉ. द्वारकादास लोहिया, नंदकिशोर मुंदडा, रोटरीचे प्रांतपाल डॉ. दीपक शिकारपूर, प्रफुल्ल मिरजगावकर, उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, अप्पर अधीक्षक एम. पी. कराडे, उपनगराध्यक्ष राजकिशोर मोदी, अंकुशराव काळदाते, शिवाजी कुलकर्णी, प्रा. संगीता ठोंबरे आदी उपस्थिती होते. सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, प्रसाद चिक्षे, वैजनाथ देशमुख, सूर्यकांत मोहरीर, रोटरीचे अध्यक्ष बाबूराव बाभुळगावकर, जगदीश जाजू, डॉ. सुरेश आरसुडे, डॉ. डी. एच. थोरात, भागवत कांबळे, मनोज लखेरा यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर) सवाद्य वरात सकाळी ८ वाजल्यापासूनच विवाह सोहळ्याची लगबग सुरू होती. सर्व वधुवरांची मिरवणूक बँड पथकासह व फटाक्यांच्या आतषबाजीत शहरातून निघाली. वºहाडींसाठी गोडधोड जेवणाची सोय केली होती.