शंभर साई भक्तांची पायी दिंडी शिर्डीकडे रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:28 IST2020-12-17T04:28:39+5:302020-12-17T04:28:39+5:30
फु फुलंब्री : शहरातील शंभर साई भक्तांची पायी दिंडी शनिवारी शिर्डीकडे रवाना झाली. या दिंडीचे हे आठवे वर्ष असून, ...

शंभर साई भक्तांची पायी दिंडी शिर्डीकडे रवाना
फु
फुलंब्री : शहरातील शंभर साई भक्तांची पायी दिंडी शनिवारी शिर्डीकडे रवाना झाली. या दिंडीचे हे आठवे वर्ष असून, अखंडपणे साई नामाचा जागर करीत शिर्डीला पोहोचणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
फुलंब्रीतील तरुण दसरा संपताच दुसऱ्या किंवा चौथ्या रविवारी शिर्डीकडे पायी दिंडी घेऊन जातात. यंदा कोरोनाचे संकट आल्याने त्याला विलंब झाला; परंतु या पायी पालखी सोहळ्याला खंड पडू न देण्याचा संकल्प युवकांनी केला होता. अखेर रविवारी सकाळी शिर्डीकडे हा सोहळा निघाला. तीन दिवसांच्या पायी प्रवासानंतर मंगळवारी ही दिंडी साईबाबांच्या दर्शनासाठी दाखल होईल. या सोहळ्यात मनोज पिंजारी, मनोज वाघ, सुदर्शन काथार, भगवान होनमाळी, नीलेश शेरकर, राहुल राऊत, सागर राऊत, सागर चव्हाण, पवन शेरकर, संजय वाघ, हरिदास घडामोडे, गजानन तावडे, आकाश राऊत, आकाश ढोके, गणेश शेरकर आदी युवकांचा सहभाग आहे.
फोटो -