जिल्ह्यात दिवसाकाठी जळताहेत शेकडो रोहित्र; शेतकरी त्रस्त
By Admin | Updated: November 2, 2016 01:08 IST2016-11-02T01:06:54+5:302016-11-02T01:08:28+5:30
जालना :विजेचा कमी अधिक दाब होत असल्याने दिवसाकाठी शेकडो जळत आहेत.

जिल्ह्यात दिवसाकाठी जळताहेत शेकडो रोहित्र; शेतकरी त्रस्त
जालना : यंदा पाऊस चांगला झाला आहे. त्यामुळे रबी हंगामातील पिकांना देण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. मात्र विजेचा कमी अधिक दाब होत असल्याने दिवसाकाठी शेकडो जळत आहेत. महावितरणकडूनही रोहित्र दुरूस्त टाळाटाळ होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
जालना जिल्ह्यात महावितरणचे दोन विभाग आहे. विभाग एकमध्ये जालना, बदनापूर, भोकरदन , जाफराबाद तर दोन मध्ये मंठा परतूर, घनसावंगी, अंबड या तालुक्यांचा समावेश आहे. आठ तालुक्यात मिळून ६३ व १०० केव्हीएची १५ हजार रोहित्र आहेत. मात्र अनेक रोहित्रांची नियमित देखभाली नसल्याने तसेच शेतकरी थेट आकडे टाकत असल्याने रोहित्रांवर क्षमतेक्षा अधिक भार वाढून ते जळण्याचे प्रमाण वाढले आहे. महावितरणच्या म्हणण्यानुसार दिवसाकाठी दहा रोहित्र जळत असले तरी जिल्ह्यात शेकडो रोहित्र दररोज जळतात अथवा बिघाड होत असल्याचे चित्र आहे. रोहित्र जळाल्याने पाणी असूनही शेतकऱ्यांना ते पिकांस देण्यास अडचणी येत आहेत.
महावितरणचे अधीक्षक अभियंता बी.टी. जाधव म्हणाले, ३० ते ४० रोहित्रांची दुरूस्ती बाकी आहे. रोहित्र दुरूस्तीसाठी चार एजन्सी आहेत. त्यांच्याकडून तात्काळ रोहित्र दुरूस्त करून घेण्यात येते. शेतकऱ्यांनी थेट आकडे टाकू नये, दाब योग्य राहण्यासाठी कॅपिसीटरचा वापर करावा. त्यामुळे रोहित्र जळणार नाहीत. शेतकऱ्यांनी अथवा ग्रामीण भागात आकडे वापरू नये. आकड्यांमुळे वीज वाहिनीसोबतच रोहित्रांवर दाब येऊन मोठे बिघाड होतात. वीजमीटर घेऊन व महावितरणने सांगितलेल्या नियमानुसार वीज वापर केल्यास शेतकऱ्यांची गैरसोय होणार नसल्याचे महावितरणचे अधिकारी सांगतात. (प्रतिनिधी)