शेकडो लिटर पाण्याचा अपव्यय
By Admin | Updated: April 10, 2015 00:25 IST2015-04-10T00:09:36+5:302015-04-10T00:25:50+5:30
जालना: शहराच्या विविध भागात पालिकेचे नळ आहेत. या नळांची कोणतीच देखभाल नसल्याने पाणी आले की शेकडो लिटर पाण्याचा अपव्यय होतो.

शेकडो लिटर पाण्याचा अपव्यय
जालना: शहराच्या विविध भागात पालिकेचे नळ आहेत. या नळांची कोणतीच देखभाल नसल्याने पाणी आले की शेकडो लिटर पाण्याचा अपव्यय होतो. नळांच्या समस्येसोबतच अनेक ठिकाणी जलवाहिनीला गळती लागल्याने तेथेही पाण्याचा मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय सुरुच असतो.
गुरुवारी शहरातील काही भागात सर्वेक्षण केले असता ज्या भागात पाणी आलेले होते. तेथील नळ तसेच जलवाहिनीतून पाण्याची नासाडी सुरु होती. नवीन जालना व जुना जालना भागात मिळून ३० पेक्षा अधिक ठिकाणी शासकीय नळ आहेत. येथून परिसरातील शेकडो नागरिक पाणी भरतात. काही ठिकाणी नळांना तोट्या बसवलेल्या आहेत. तर काही नळांची अवस्था बिकट आहे. पाणी आले की वाया जाते. काही नळांना नागरिकांनी प्लास्टिक पाईप लावून पाणी अडविण्याचा प्रयत्न केला आहे. एकूणच शहरातील पालिका नळांची अवस्था भयावह आहे. बहुतांश नळ मोठ्या नाल्यांजवळ असल्याने पाणी प्रदूषित होण्याचा धोका अधिक आहे. तोट्या नसलेल्या नळांना पालिका तोट्या बसविणार होते. याचीही अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. काही नळ जमिनीत बुजले आहेत. नळांना पाणी आले की, लक्कड कोट, चमन, भोकरदन नाका, दु:खी नगर, रामनगर, नूतन वसाहत आदी भागात पाणी वाहून जाते. (प्रतिनिधी)