शेकडो बोअर फेल, ७० हातपंप बंद

By Admin | Updated: February 18, 2016 23:46 IST2016-02-18T23:40:31+5:302016-02-18T23:46:54+5:30

लक्ष्मण तुरेराव, धर्माबाद तालुक्यात पाणीटंचाई भासत असून पाणीटंचाईवर मात करण्यासाठी बहुतांश शेतकरी, नागरिक घरगुती ठिकाणी व शेतात बोअर मारत आहेत़

Hundreds of boar failure, 70 handpumps closed | शेकडो बोअर फेल, ७० हातपंप बंद

शेकडो बोअर फेल, ७० हातपंप बंद

लक्ष्मण तुरेराव, धर्माबाद
तालुक्यात पाणीटंचाई भासत असून पाणीटंचाईवर मात करण्यासाठी बहुतांश शेतकरी, नागरिक घरगुती ठिकाणी व शेतात बोअर मारत आहेत़ पाणीपातळी खूपच खाली गेल्याने शेकडो बोअर व ७० ते ८० हातपंप बंद पडले आहेत़ त्यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे़
धर्माबाद तालुक्यात बाभळी बंधारा सोडला तर एकही गुंठा शासनाच्या ओलिताखाली नाही़ तोही बाभळी बंधारा दोन वर्षांपासून कोरडाच पडला आहे़ सतत दोन-तीन वर्षांपासून पर्जन्यमान कमी झाल्याने नदी, तलाव, विहीरी कोरड्या पडल्या आहेत़ पाणीपातळीही खालावल्याने बहुतांश ठिकाणचे हातपंप बंद पडले आहेत़ जनावरांच्या पाणी, चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत असल्याने शेतकरी जनावरांच्या चाऱ्यासाठी शेतात पैसे खर्च करूनबोअर मारत आहेत़ एक बोअर फेल गेला तर दोन-तीन ठिकाणी बोअर मारत असले तरीही फेल ठरत आहे़ असे एका-एका शेतकऱ्याने तीन-तीन ठिकाणी बोअर मारले तरीही पाणी लागत नसल्याने ते चिंताग्रस्त होत आहेत़ गोदावरी नदीकाठच्या शेतातही बोअरला पाणी लागत नाही़ तर डोंगराळ भागात आहे ते बोअरचे पाणी आटत आहे़ नदी, तलाव, विहिरी कोरड्या पडल्याने जनावरांना पाणी मिळणे अवघड झाले़

Web Title: Hundreds of boar failure, 70 handpumps closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.