जिल्ह्यातील अपंगांचे दीडशे कर्ज प्रस्ताव धूळखात...!
By Admin | Updated: May 12, 2016 00:25 IST2016-05-12T00:12:10+5:302016-05-12T00:25:24+5:30
जालना : जिल्ह्यातील जवळपास दीडशे अपंगांचे कर्ज प्रस्ताव पडून असून, त्याशिवाय ३१८ अपंगांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळालेला नसल्याचा सूर

जिल्ह्यातील अपंगांचे दीडशे कर्ज प्रस्ताव धूळखात...!
जालना : जिल्ह्यातील जवळपास दीडशे अपंगांचे कर्ज प्रस्ताव पडून असून, त्याशिवाय ३१८ अपंगांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळालेला नसल्याचा सूर सामाजिक कार्यकर्ता समन्वय समितीच्यावतीने आयोजित अपंगांच्या बैठकीतून उमटला. दरम्यान, अपंगांचे प्रश्न सोडविण्यासाठी लढा उभारण्याचा निर्णयही घेण्यात आला.
सामाजिक कार्यकर्ता समन्वय समितीच्यावतीने रविवारी आयोजित बैठकीत जगदीश येनगुपटला अध्यक्षस्थानी होते. ते म्हणाले, अपंग लाभार्थ्यांनी समाज कल्याण खात्याकडे कृत्रिम अवयवासाठी अर्ज सादर केलेले आहेत. परंतु सदरचे २१३ प्रस्ताव निकाली काढले नाहीत. जिल्हा शल्य चिकित्सकांनी अपंगांचे ३७२ प्रमाणपत्र रद्द केलेले आहेत. अन्न सुरक्षा योजनेत अपंगांना सहभागी करावे, अंध, कर्णबधीर अपंगांना वैद्यकीय तपासणीसाठी जालना रुग्णालयातच व्यवस्था करावी, यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.यावेळी प्रवीण राऊत, दिपक टेहरे, पाखरे, संजय महापुरे, रुख्मिणी शेजूळ, देवराव आहेर, अंबिलवादे, वंदना मुरकूटे, कल्पना शेजूळ आदी उपस्थित होते.