शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
2
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
3
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
4
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
5
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
6
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
7
ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पाकिस्तानसारखी अवस्था, करारावरून वाद, खेळाडू आणि बोर्ड आमने-सामने, ५ क्रिकेटपटूंनी घेतला असा निर्णय
8
परदेशातून भारतात आले ११.४ लाख कोटी रुपये, जगातील सर्वाधिक 'रेमिटन्स' मिळवणारा देश
9
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
10
"आई-वडिलांना सोड तरच..."; हमाली करुन बायकोला शिकवलं, नोकरी मिळताच नवऱ्याला धमकी
11
फोटोवर थुंकला, मग हर की पैडीमध्ये जिवंत पत्नीचं केलं पिंडदान, व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ
12
मातृत्वाचे ममत्व अन् सर्वोच्च त्याग ; ‘ती’च्या किडनीदानाने ३७ मुलांना जीवनदान
13
कोकण, गोवा प्रवाशांना रेल्वेचा सुखद दिलासा; साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे, जाणून घ्या संपूर्ण माहिती 
14
तिन्ही बापलेक विहिरीत उतरले अन अचानक विहीर ढासळली; मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून अंत
15
संसार वाऱ्यावर सोडून चार मुलांची आई शेजाऱ्यासोबत फरार! हतबल पतीने उचललं टोकाचं पाऊल
16
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
17
सोमनाथ : अखंड श्रद्धापर्व अन् महाराष्ट्राशी जडलेले अभेद्य नाते
18
Elvish Yadav : "२ दिवसांत १० कोटी दे, नाहीतर गोळ्या घालू...", एल्विश यादवला जीवे मारण्याची धमकी
19
Video - भक्ती, दातृत्वाचा संगम! भाविकांना प्रसादात मिळतात चक्क पैसे; मंदिरातील अनोखी परंपरा
20
इराणसोबतच्या 'पीस डील'साठी अमेरिकेची मोठी पावलं! मार्को रुबियो अन् कतारच्या पंतप्रधानांमध्ये खलबतं
Daily Top 2Weekly Top 5

जुन्याच मार्गावर धावतात मानव विकासच्या बसेस

By admin | Updated: June 17, 2014 00:40 IST

हिंगोली : नवशैक्षणिक वर्षाची सुरूवात झाली असताना मानव विकास मिशनच्या बसेस मात्र जुन्याच मार्गाने धावतात. गतवर्षी शैक्षणिक वर्षाचा पहिला महिना गेल्यानंतर मार्गाचा तिढा सुटला होता.

हिंगोली : नवशैक्षणिक वर्षाची सुरूवात झाली असताना मानव विकास मिशनच्या बसेस मात्र जुन्याच मार्गाने धावतात. गतवर्षी शैक्षणिक वर्षाचा पहिला महिना गेल्यानंतर मार्गाचा तिढा सुटला होता. यंदाही तिच स्थिती असून आगाराकडून मार्गाबाबत पत्र पाठवूनही पहिल्या दिवशी मानव विकासच्या बसेसचे मार्ग पंचायत समितीकडून आलेले नव्हते. परिणामी जुन्याच मार्गावरून या बसेस धावत आहेत.
मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी शासनाकडून वेगवेगळ्या स्तरांवर प्रयत्न केले जात आहेत. त्यानुषंगाने मुलींच्या शिक्षणाचा टक्का वाढण्यासाठी मानव विकास मिशनने बसेसची व्यवस्था केली आहे. घरापासून शाळेपर्यंत आणि शाळेपासून घरापर्यंत मुलींच्या येण्या-जाण्याची व्यवस्था केली आहे. त्यातून दुर्गम भागातील मुलींना शाळेत जात येईल, हा त्यामागचा प्रमूख उद्देश आहे. म्हणून राज्यभरात मानव विकास मिशनच्या बसेस धावत आहेत. हिंगोली जिल्ह्यातील तीन तालुक्यात मिळून १५ बसेस धावतात. प्रतिवर्षी या बसेसचा मार्ग पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडून निश्चित करण्यात येतो. त्याआधी बीडीओ तिन्ही तालुक्यातील मुख्याध्यापकांकडून मुलींची पटसंख्या मागविली जाते. त्यानुसार बसेसचे मार्ग आखले जातात. नवमार्गासाठी हिंगोली आगाराकडून गटविकास अधिकाऱ्यांना पत्र पाठविण्यात आले होते. त्यावर बीडीओंनी जुन्याच मार्गाचे बसेस सुरू ठेवण्याचे सांगितले.
परिणामी हिंगोली आगाराने शाळेच्या पहिल्या दिवशी जुन्याच मार्गावर बसेस सोडल्या आहेत. जुन्या मार्गावर विद्यर्थिनीच्या संख्येबाबत आगार अनभिज्ञ आहे. सख्या वाढली तर फायदाच मात्र घटलेल्या संख्येच्या ठिकाणी बसेस धावत आहे. नवीन मार्गासाठी आणखी किती दिवसाचा कालावधी लागेल, याची निश्चिती नाही.
बसेसचा मुलींना फायदा
मानव विकास मिशनच्या बसेसचा फायदा विद्यार्थिनींना होत आहे. बसेस धावणाऱ्या तिन्हीही तालुक्यातील मुलींनी बारावीच्या निकालात मुलांपेक्षा आघाडी घेतली. विशेषत: औंढा नागनाथ तालुक्यातील विद्यार्थिंनी जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ९६.१५ टक्के गुण मिळविले. औंढा तालुक्यातील पिंपळदरी, लोहरा, रामेश्वर आदी ठिकाणी या बसेस धावतात. एकूण पाच बसेस या तालुक्यासाठी आहेत.
बसेसचे जूने मार्ग
हिंगोली- हिंगोली-खेर्डावाडी, हिंगोली-सिरसम-पातोंडा, सिरसम-खेर्डावाडी, हिंगोली-कनेरगाव-वाढोणा. औंढा नागनाथ- औंढा-पिंपळदरी, औंढा-माथा, औंढा-ब्रह्मवाडी, औंढा-रामेश्वर. सेनगाव- सेनगाव-पानकनेरगाव, सेनगाव-म्हाळशी, सेनगाव-जयपूर, गोरेगाव-केंद्रा बु, केंद्रा बु-जामठी, सेनगाव-साखरा. (प्रतिनिधी)