शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या श्रावणी सोमवारी श्री घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी, शिवभक्तांची वर्दळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 14:31 IST

वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिरात भक्तांची मोठी गर्दी, सुरक्षेची तगडी व्यवस्था

- सुनील घोडके

खुलताबाद: श्रावण महिन्यातील पहिल्या श्रावणी सोमवारी वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून गर्दी झाली होती. वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिरात भाविकांच्या सोयीसाठी रविवारी रात्रीपासून दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले असल्याने रात्रीपासून दर्शनासाठी गर्दी सुरू झाली होती. पहाटे ३ पासून पायी येणारे पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शनासाठी मोठी केली होती. बम बम भोले, ओम नम: शिवाय, हर हर महादेवाच्या जय घोष करत दर्शन घेत होते. मंदीरातील अभिषेक व महापुजा मंदीर प्रशासनाने बंद केल्याने भाविकांचे थेट दर्शन होत होते. मंदीर परिसरात भाविकांना फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांच्या सोयीसाठी जादा एस टी बसेस, सिटी बसेस सोडण्यात आल्या असून कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

पहाटे दर्शनावरून किरकोळ वादबारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिरात पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मात्र, पहाटेच्या वेळी दर्शनासाठी थेट प्रवेश देण्यावरून स्थानिक भाविक आणि सुरक्षा रक्षकामध्ये वाद होऊन त्याचे पर्यवसान मारहाणीत झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

नेमका वाद का आणि कसा झाला?श्रावण महिन्यात दर सोमवारी पहाटे ४ ते सकाळी ८ या वेळेत पंचक्रोशीतील स्थानिक नागरिक आणि महिनाभर पायी वारी करणाऱ्या भक्तांना थेट दर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला जातो. याच प्रथेनुसार, खुलताबाद येथून पायी आलेल्या काही तरुण भाविकांनी थेट प्रवेशाची मागणी केली. मात्र, सुरक्षा रक्षकाने त्यांना रांगेतून येण्यास सांगितल्याने वादाला सुरुवात झाली.

सामंजस्याने या प्रकरणावर पडदा टाकलासुरुवातीला शाब्दिक चकमक झाली, पण काही वेळातच रूपांतर धक्काबुक्की आणि मारहाणीत झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून उपस्थित इतर भाविक आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ मध्यस्थी केली आणि वाद मिटवला. यानंतर मंदिर विश्वस्त मंडळ आणि संबंधित भाविकांनी सामंजस्याने या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला.

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर