शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
4
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
5
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
6
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
7
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
8
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
9
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
10
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
11
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
12
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
13
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
14
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
15
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
16
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
17
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
18
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
19
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
20
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
Daily Top 2Weekly Top 5

तक्रारी आलेल्या परीक्षा केंद्रांचा स्टाफ बदलला; नवीन अधिकाऱ्यांना पालकांकडून धमक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 11:36 IST

HSC/SSC Exam:पोलिस संरक्षण घेण्याची वेळ, शिक्षणाधिकाऱ्यांची धक्कादायक माहिती

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रांवरील काही तक्रारी आल्यानंतर त्या ठिकाणचा स्टाफ बदलण्यात आला आहे. त्यानंतर नेमलेल्या केंद्र संचालक, पर्यवेक्षकांना संबंधित केंद्राच्या परिसरातील नागरिक, पालकांकडून धमक्या देण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी दिली.

जिल्ह्यातील दहावी, बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त घेण्यासाठी शिक्षण विभागासह महसूल विभाग प्रयत्न करीत आहे. त्यानुसार भरारी पथकांनी भेट दिलेल्या ठिकाणी गडबड असल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित ठिकाणचा संपूर्ण स्टाफ बदलला आहे. नवीन दिलेला स्टाफ कोणत्याही प्रकारची कॉपी होऊ न देता परीक्षा सुरळीत घेत असल्यामुळे काही केंद्रांवर संचालक, पर्यवेक्षकांना धमकावण्यात येत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. पैठण तालुक्यातील श्रीराम माध्यमिक विद्यालय, बोकूड जळगाव या ठिकाणी कॉपी करू देण्यासाठी केंद्र संचालकांना धमकावण्यात आले. याविषयीची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी संबंधित परिसरातील पोलिस ठाण्याचे प्रमुख एपीआय नीलेश शेळके यांना कळविले. तेव्हा त्यांनी तत्काळ अतिरिक्त बंदोबस्त पाठविल्याचे शिक्षणाधिकारी लाठकर यांनी सांगितले.

त्याशिवाय भीमाशंकर विद्यालयातील परीक्षा केंद्रावरही अशाच पद्धतीने परिसरातील नागरिक, पालकांनी संचालक व पर्यवेक्षकांना धमकावण्याचा प्रयत्न केला. त्याशिवाय खुलताबाद तालुक्यातील शांताराई कनिष्ठ महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावरील संपूर्ण स्टाफ बदलून जि.प.च्या प्राथमिक शाळेतील स्टाफ देण्यात आला. त्या ठिकाणी विस्तार अधिकारी भोसले यांना समन्वयक नेमले होते. त्यांनी उत्तमपणे परीक्षा घेतल्याबद्दल सीईओ विकास मीना यांनी त्यांचे अभिनंदन केल्याचेही लाठकर यांनी सांगितले.

आठ केंद्रे कायमस्वरूपी बंदची शिफारसजिल्ह्यात परीक्षेत गडबड करणाऱ्या सहा केंद्रे आगामी वर्षापासून केंद्र कायमस्वरूपी बंद करण्याची शिफारस विभागीय मंडळाकडे केली आहे. त्यामध्ये निमगाव आणि ओव्हर जटवाडा या ठिकाणच्या केंद्रांची भर पडली असल्यामुळे एकूण आठ केंद्रांवर आतापर्यंत कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याचेही शिक्षणाधिकारी लाठकर यांनी सांगितले.

टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षाssc examदहावीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर