शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

बारावीच्या विद्यार्थ्यांना ‘शॉक ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 12:22 AM

महावितरणच्या गलथान कारभारामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना ऐन परीक्षेच्या तोंडावर बुधवारी रात्री शॉक बसला. सातारा-देवळाईसह परिसरातील विविध भागांतील वीजपुरवठा रात्री ९ वाजेच्या सुमारास खंडित झाला. परिणामी हा संपूर्ण परिसर अंधारात बुडाला. रात्री बारावाजेपर्यंत दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडाल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

ठळक मुद्देचार तास वीजपुरवठा खंडित : सातारा-देवळाईसह परिसर अंधारात, विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडाला

औरंगाबाद : महावितरणच्या गलथान कारभारामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना ऐन परीक्षेच्या तोंडावर बुधवारी रात्री शॉक बसला. सातारा-देवळाईसह परिसरातील विविध भागांतील वीजपुरवठा रात्री ९ वाजेच्या सुमारास खंडित झाला. परिणामी हा संपूर्ण परिसर अंधारात बुडाला. रात्री बारावाजेपर्यंत दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडाल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.बारावीच्या परीक्षांना गुरुवारपासून (२१) सुरुवात होत आहे. पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाचा पेपर आहे. इंग्रजी विषयाविषयी आधीच भीती बाळगली जाते. त्यामुळे पेपरच्या काही तास अगोदर मिळणाऱ्या वेळेत विद्यार्थी अभ्यासाला प्राधान्य देतात. पहिल्या पेपरला सामोरे जाण्यापूर्वीच वीजपुरवठा खंडित झाल्याने विद्यार्थी आणि पालकांना अडचणीला सामोरे जाण्याचा प्रकार बुधवारी रात्री झाला. सातारा-देवळाई परिसरातील वीज रात्री ९ वाजेच्या सुमारास अचानक ‘गुल’ झाली. काही मिनिटांत लाईट परत येईल, या आशेने नागरिकांनी सुरुवातीला दुर्लक्ष केले; परंतु अर्धा तास उलटूनही वीजपुरवठा सुरळीत झाला नाही. एमआयटी परिसरापासून देवळाईपर्यंतचा संपूर्ण परिसर अंधारात बुडाला होता. शिवाजीनगर परिसरातील वीजपुरवठा बंद असल्याची तक्रार नागरिकांनी केली. या प्रकारामुळे बारावीचे विद्यार्थी असलेल्या घरातील पालकांची चिंता वाढली. बराच वेळ प्रतीक्षा करूनही पुरवठा सुरळीत होत नसल्याचे लक्षात येताच नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधला. सातारा परिसरात बिघाड झाला असून वीजपुरवठा सुरळीत होण्यास वेळ लागेल, काम सुरूआहे, अशी उत्तरे देण्यात येत होती. त्यामुळे महावितरणच्या कारभाराविषयी नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.मोबाईल, चार्जेबल लाईटच्या उजेडात अभ्यासबारावीची परीक्षा सुरू होणार असतानाच महावितरणने वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज होती; परंतु त्याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडाला.३३ के. व्ही. लाईनमध्ये बिघाडसातारा परिसरात ३३ के. व्ही. लाईनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे सातारा-देवळाईतील वीजपुरवठा खंडित झाला. दुरुस्तीचे काम सुरूआहे, अशी माहिती महावितरणचे जनसंपर्क अधिकारी आणि कार्यकारी अभियंत्यांनी रात्री ११.१५ वाजेच्या सुमारास दिली. आणखी एक तास दुरुस्तीला लागेल, असेही सांगण्यात आले.

टॅग्स :electricityवीजAurangabadऔरंगाबाद