बारावीचा निकाल ९० टक्के

By Admin | Updated: June 3, 2014 00:43 IST2014-06-03T00:41:43+5:302014-06-03T00:43:17+5:30

नांदेड : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत जिल्ह्याचा निकाल ९० टक्के लागला आहे़

HSC results for 90% | बारावीचा निकाल ९० टक्के

बारावीचा निकाल ९० टक्के

नांदेड : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत जिल्ह्याचा निकाल ९० टक्के लागला आहे़ परीक्षेला बसलेल्या २४ हजार ३७४ विद्यार्थ्यांपैकी २२ हजार ५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत़ जिल्ह्यातील १७ शाळांचा निकाल १०० टक्के लागला़ जिल्ह्याच्या एकूण निकालात मुलींच्या यशाचे प्रमाण ९४़३ टक्के आहे तर मुलांचे प्रमाण हे ८८़५ टक्के आहे़ जिल्ह्यातील ७२ परीक्षा केंद्रांवर एकूण २४ हजार ४७९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती़ त्यातील २२ हजार ५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत़ जिल्ह्याच्या एकूण निकाल ९०़५० टक्के लागला आहे़ एकूण निकालात मुलींनी बाजी मारली आहे़ जिल्ह्यात ९ हजार ६६३ मुलींनी बारावी परीक्षा दिली होती़ त्यातील ९ हजार ८६ विद्यार्थिंनी उत्तीर्ण झाल्या आहेत़ तर १४ हजार ८१६ मुलांपैकी १३ हजार ४६ मुले उत्तीर्ण झाले आहेत़ जिल्ह्यातील १७ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे़ तर एका शाळेचा निकाल शून्य टक्के लागला आहे़ ९१ ते १०० टक्के निकाल असलेल्या शाळांची संख्या ११४ आहे़ तर ८१ ते ९० टक्के निकाल असलेल्या ६२ शाळा, ७१ ते ८० टक्के निकाल असलेल्या १७ शाळा, ६१ ते ७० टक्के निकाल असलेल्या ९ शाळा, ५१ ते ६० टक्के निकाल असलेल्या ९ शाळा, ४१ ते ५० टक्के निकाल असलेल्या २ टक्के आणि ३१ ते ४० टक्के, २१ ते ३० टक्के आणि ० ते २० टक्के शाळा असलेल्या प्रत्येकी १ शाळा जिल्ह्यात आहेत़ जिल्ह्यात गतवर्षी बारावीचा निकाल ६३ टक्के होता़ यावर्षी निकालाचे प्रमाण वाढून ९०़५० टक्क्यांवर गेले आहे़ निकालामध्ये २७ टक्के वाढ झाली आहे़ जिल्ह्याच्या निकालात २०१० पासून वाढ झाली आहे़ २०१० मध्ये बारावीचा निकाल हा ३१ टक्के होता़ कॉपीमुक्ती मोहिमेमुळे निकाल कमी झाला होता़ दुसर्‍या वर्षीही जिल्ह्यात कॉपीमुक्ती मोहीम कडकपणे राबविण्यात आली़ २०११ मध्ये निकाल उंचावून ५३ टक्के तर २०१२ मध्ये ६० टक्के निकाल लागला़ जिल्ह्यात राबविलेल्या कॉपीमुक्ती मोहिमेमुळे निकाल उंचावतच चालला आहे़ (प्रतिनिधी)शंभर टक्के निकाल असलेल्या शाळा मौलाना उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मिल एरिया नांदेड, कै़ गंगाबाई पोतन्ना सबनवाड मा़ व उच्च माध्य़ विद्यालय, कुंडलवाडी ता़ बिलोली, उर्दू उच्च माध्यमिक विद्यालय कुंडलवाडी, राजर्षी छत्रपती शाहू सैनिकी शाळा, सगरोळी, ता़ बिलोली, श्री दत्त ज्युनिअर कॉलेज तळणी ता़ हदगाव, सुभाषराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळका, ता़ कंधार, ज्ञानेश्वर ज्यु़ कॉलेज बोधडी ता़ किनवट, मातोश्री कमलाताई खमके विद्यालय, गोकुंदा, जगदंबा ज्यु. कॉलेज माहूर, वसंतराव नाईक विद्यालय, सिंदखेड ता़ माहूर, यमुनाबाई मा़ व उच्च माध्यमिक विद्यालय नायगाव, नाथोबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गडगा, ता़ नायगाव, पंचवटी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राहेर, ता़ नायगाव, दत्त ज्यू़ कॉलेज खंडगाव, ता़ नायगाव, चांगुबाई पवार कॉलेज देगाव ता़ नायगाव, संत दासगणू महाराज कॉलेज शिरूर ता़ उमरी आणि कै़ ग्यानबाजी केशवे माध्यमिक विद्यालय, माहूऱ

Web Title: HSC results for 90%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.