शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
4
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
5
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
6
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
7
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
8
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
9
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
10
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
11
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
12
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
13
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
14
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
15
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
16
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
18
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
19
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
20
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख

धक्कादायक! १२ वीच्या परीक्षा केंद्रावर खासगी क्लासचे ११ शिक्षक बनले पर्यवेक्षक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 18:00 IST

HSC Exam Mass Copy: फुलंब्री तालुक्यातील आदर्श विद्यालयाच्या परीक्षा केंद्रांवरील आणखी एक घोळ

- रऊफ शेखफुलंब्री : तालुक्यातील पिंपळगाव वळण येथील आदर्श विद्यालयात सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षा केंद्रांवर आडगाव बु. येथील काशीराम विद्यालयाच्या नावावर छत्रपती संभाजीनगर शहरातील एका खासगी कोचिंग क्लासचे ९, तर खासगी इंग्रजी शाळांचे दोन शिक्षक पर्यवेक्षक म्हणून काम पाहात असल्याची बाब उघड झाली आहे.

पिंपळगाव वळण येथील आदर्श विद्यालयात बारावीच्या परीक्षा केंद्राला शनिवारी दुपारी १२:०० वाजता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी अचानक भेट दिली असता येथे सामूहिक कॉपी आढळली. याप्रकरणी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून २८ जणांविरूद्ध फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर याप्रकरणाचा तपास पोलिस करीत असले तरी येथे पर्यवेक्षक म्हणून काम करण्यासाठी केलेला घोळ समोर आला आहे. खासगी किवा जिल्हा परिषद शाळेचा काडीमात्र सबंध नसताना छत्रपती संभाजीनगर शहरातील एका खासगी कोचिंग क्लासचे ९ शिक्षक, तर बाजारसांवगी येथील दोन इंग्रजी शाळेच्या दोन शिक्षकांनी आडगाव बु. येथील काशीराम विद्यालयाच्या लेटर हेडचा उपयोग करून पर्यवेक्षक म्हणून आपली वर्णी लावल्याची चर्चा आहे. काशीराम विद्यालयाच्या वतीने पर्यवेक्षक म्हणून दाखविलेले व्ही. व्ही. नलावडे हे बाजारसांवगी येथील रायझिंग स्टार इंग्रजी शाळेचे मुख्याध्यापक आहेत, तर आर. आर. वेताळ हे बाजारसांवगी येथीलच साई पब्लिक इंग्लिश स्कूलचे शिक्षक आहेत. एस. यु. भोपळे हे डोंगरगाव कवाड येथील जिल्हा परिषद शाळेत नुकतेच मुख्यमंत्री युवा कौशल योजनेत अंशकालीन शिक्षक म्हणून रूजू झाले आहेत. असे असताना ते आदर्श विद्यालयात पर्यवेक्षक म्हणून काम पाहात असल्याचे समोर आले आहे.

काशीराम विद्यालयाच्या नावाने केंद्रावर कार्यरत शिक्षकपी. ए. जाधव, नेहा लगड, एस. यु. भोपळे, ए. एन. सुरडकर, आर. आर. वेताळ, आर. बी. झाला, ए. बी. जाधव, पी. एस. वाकळे, एम. डी. पाटील, व्ही. व्ही. नलावडे, एल. के. डोळस हे सर्व ११ शिक्षक काशीराम विद्यालयाच्या वतीने परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक म्हणून परीक्षा सुरू झाल्यापासून काम पाहत होते. प्रत्यक्षात त्यांचा या शाळेशी काहीही संबंध नाही.

११ शिक्षक आमचे नाहीतच : मुख्याध्यापक मगरआदर्श विद्यालयातील सामूहिक कॉपी प्रकरणात ज्या शिक्षकांवर गुन्हे दाखल झाले आहेत, त्यामधील १२ पैकी ११ शिक्षक आमच्या शाळेचे नाहीत. केंद्र संचालकाने आमच्या शाळेच्या लेटरहेडचा गैरवापर करून आमच्या शाळेचे असल्याचे दाखविले. ही बाब गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्हाला समजली. याविषयी आम्ही तक्रार करणार आहोत.-पंडित मगर, मुख्याध्यापक, काशीराम विद्यालय

‘ते’ कर्मचारी गरुडझेप अकॅडमीचे ?आदर्श विद्यालयाच्या परिक्षा केंद्रावर पर्यवेक्षक म्हणून काम करणारे ते ९ शिक्षक गरुडझेप अकॅडमीचे असल्याची शिक्षण वर्तुळात चर्चा होती. या अनुषंगाने गरुडझेप अकॅडमीचे संचालक सुरेश सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे ९ शिक्षक गरुडझेप अकॅडमीचे नसल्याचे सांगितले. त्यामुळे हे शिक्षक काशीराम विद्यालयाचे किंवा गरुडझेप अकॅडमीचे नसतील तर मग कोणत्या शाळेचे आहेत? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

२८ जणांविरुद्ध गुन्हे दाखलयाप्रकरणी गटशिक्षणाधिकारी क्रांती धसवाडीकर यांच्या फिर्यादीवरून संस्था अध्यक्ष लताबाई काशिनाथ जाधव, सचिव योगेश काशिनाथ जाधव, पर्यवेक्षक पी. ए. जाधव, नेहा लगड, एस. यू. भोपळे, पी. एस. काकडे, ए. बी. थोरात, ए. एन. शेख, के. बी. पवार, एस. जी. लोखंडे, ए. एन. सुरडकर, ए. बी. गायकवाड, आर. आर. वेताळ, पी. के. घुगे, एन. एस. ठाकूर, आर. बी. झाला, ए. बी. जाधव, व्ही. डी. तायडे, पी. एस. वाकळे, एम. डी. पाटील, व्ही. व्ही नलावडे, एल. के. डोळस, जे. बी. पवार, एस. टी. निर्मळ, बैठे पथकातील तलाठी आर. एस. देशमुख, पोलिस जमादार पंकज पाटील, होमगार्ड बी. एस. चव्हाण, जे. बी. पवार अशा एकूण २८ जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरHSC / 12th Exam12वी परीक्षाCrime Newsगुन्हेगारी