प.पू. गणेशलाल म.सा. पुण्यतिथी महोत्सव
By Admin | Updated: January 26, 2017 00:02 IST2017-01-26T00:01:37+5:302017-01-26T00:02:43+5:30
जालना : जैन समाजबांधवांचे श्रद्धास्थान असलेले प.पू. गुरूदेव १००८ श्री. गुरू गणेशलाल म.सा. यांचा ५५ वा पुण्यतिथी सोहळ्यास उत्साहात प्रारंभ झाला

प.पू. गणेशलाल म.सा. पुण्यतिथी महोत्सव
जालना : जैन समाजबांधवांचे श्रद्धास्थान असलेले प.पू. गुरूदेव १००८ श्री. गुरू गणेशलाल म.सा. यांचा ५५ वा पुण्यतिथी सोहळ्यास उत्साहात प्रारंभ झाला असून यानिमित्त २५ जानेवारी रोजी एक श्याम गुरू गणेशजी के नाम भक्तिगीत कार्यक्रम झाला. २७ जानेवारी रोजी मुख्य सोहळा होत आहे.
बुधवारी ‘एक श्याम गुरू के नाम’ भक्तीगीत संध्या व विविध धर्म आराधना करण्यात आली. २७ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता प्रार्थना, ७.३० वाजता प्रभात फेरी, ८.३० वाजता ध्वजारोहण, ९ वाजता श्री गुरूगणेश म.सा सभा प्रारंभ, दुपारी १२ वाजता गौतम प्रसादी होईल. या कार्यक्रमास प.पू. प्रमोदकुमार म.सा., प्रकाशकंवर म. सा, उज्वलकुमार म.सा.,सुशीलकुंवर म.सा, किरणसुधा म.सा., कीर्तीसुधा म.सा, प्रशांतकंवर म. सा, ज्ञानप्रभा म.सा, विशालप्रभा म.सा., आगमश्री म. सा., हर्षिता म.सा., नमिता म.सा., जयश्री म.सा., विनयकंवर म.सा., पुण्यस्मिता म.सा., प्राची म.सा, दिव्यप्रभा म.सा., चैतन्यश्री म.सा.,सजगश्री म.सा., प्रबोधी म.सा., स्वीकृतीप्रभा म.सा. आदी संत तसेच महंतांचे मार्गदर्शन व आशीर्वचन यावेळी होणार आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आ. राजेश टोपे, आ. संतोष दानवे, माजी आ. कैलास गोरंट्याल, आ. सुभाष झांबड, आ. नारायण कुचे, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, आ. चैनसुख संचेती, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल आदींची उपस्थिती राहणार आहे. यासोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन संघपती मिठालाल सकलेचा, अध्यक्ष सुदेश सकलेचा, उपाध्यक्ष डॉ. धरमचंद गादिया, महामंत्री स्वरूपचंद ललवाणी, सहसचिव कचरूलाल कुंकूलोळ, कोषाध्यक्ष भरत गादिया, विश्वस्त संजय मुथा, डॉ. गौतमचंद रूणवाल, विजयराज सुराणा, नरेंद्र लुणिया, सुरजमल मुथा, डॉ. कांतीलाल मांडोत यांनी केले.