शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजितदादांचे माहिती नाही, मी ठाकरेंना चांगलं ओळखतो"; फडणवीसांचा खोचक टोला
2
"मेरा बाप महागद्दार है..."; प्रियंका चतुर्वेदींच्या टीकेला शिवसेनेचं जशास तसं प्रत्युत्तर
3
४ जूननंतर एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील; संजय राऊतांचा इशारा
4
Smriti Irani : "हिंमत असेल तर भाऊ-बहिणीने..."; स्मृती इराणींचं राहुल-प्रियंका गांधींना खुलं आव्हान
5
मोदींची प्रकृती बरी नाही, भाजपाने त्यांना प्रचारातून बाजूला करावं; संजय राऊतांचा टोला
6
Video - ज्या व्यक्तीला बेघर समजून चिमुकल्याने दिले सर्व पैसे तो निघाला अब्जाधीश अन् मग...
7
Gold Price Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक! आज स्वस्त झालं Gold, पाहा नवे दर
8
पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे खर्च करतात आपला पगार?; मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिली माहिती
9
AI लक्ष्मीकांत बेर्डेंचा अनुभव देऊ शकत नाही, लेक अभिनय बेर्डेने स्पष्टच सांगितलं
10
३ दहशतवादी ठार, ४० तास चालली चकमक; लष्कराची मोठी कारवाई
11
दीपिकाबरोबर घटस्फोटाच्या चर्चांना रणवीरने दिला पूर्णविराम! लग्नाचे फोटो डिलीट केल्यावर म्हणतो- "माझ्या पत्नीने..."
12
'लोकसभेवेळी सर्वांचं आय लव्ह यू असतं. मात्र विधानसभेवेळी...', गुलाबराव पाटील यांचं सूचक विधान, रोख कुणाकडे, चर्चांना उधाण
13
चंद्रकांत पाटलांनी बारामतीमध्ये शरद पवार यांच्याबाबतीत बोलायला नको होते; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
15
मराठी-गुजराती वादाची 'राजकीय फोडणी'; घाटकोपरच्या 'त्या' सोसायटीतील रहिवाशी म्हणतात...
16
राजकारण तापले उद्धव सेनेच्या जिल्हाप्रमुख बडगुजर यांना हद्दपारची नोटीस
17
मुंबईतील ६ पैकी ३ जागांवर शिवसेना vs शिवसेना; एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे, कोण पडणार भारी?
18
प्रसिद्ध दिग्दर्शक संगीत सिवन काळाच्या पडद्याआड, रितेश देशमुख - श्रेयस तळपदेने वाहिली श्रद्धांजली
19
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरणीचं सत्र सुरूच; Hero Motocorp मध्ये तेजी, डॉ. रेड्डीज घसरला
20
गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेवरील संचालकपद रद्द

आमदार, खासदारांना ‘एनओसी’ देऊन वर्ष उलटले कामे कधी, हे मात्र माहीत नाही

By मुजीब देवणीकर | Published: March 21, 2024 5:20 PM

दोन वर्षांत मनपाकडून ३८२ कोटींच्या ‘एनओसी’

छत्रपती संभाजीनगर : लोकप्रतिनिधींचा विकास निधी तसेच राज्य शासनाकडून आणलेल्या विशेष निधीतून मनपाने मागील दोन वर्षांत तब्बल २ हजार २१६ विकासकामांच्या एनओसी दिल्या. त्यातील फक्त ६८८ कामे पूर्ण झाली. १२३८ कामे शिल्लक आहेत. एनओसी देऊन एक वर्ष उलटले तरी कामच सुरू झाले नाही, अशी १४१ प्रकरणे आहेत.

महापालिकेने २०२० पासून शहरात वॉर्डातील अंतर्गत रस्ते, ड्रेनेजची कामे जवळपास बंदच केली आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गल्ली-बोळात विकासकामांवर सर्वाधिक भर दिला आहे. ही सर्व विकासकामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमाने होतात. प्रत्येक लोकप्रतिनिधीकडे काम करणारा एक ‘हक्काचा’ कंत्राटदार नेमलेला आहे. ज्या भागात रस्ते नाहीत, ड्रेनेजचा प्रश्न गंभीर आहे, तेथे आमदार, खासदार विकासकामे करीत आहेत. त्यामुळे महापालिकेचा ८० टक्के ताण कमी झाला आहे. महापालिका सध्या शहरातील मुख्य रस्ते आणि इतर कामांवरच भर देत आहे.

२२१६ एनओसी दिल्यामनपाने २०२२-२३ आणि २०२३-२४ या आर्थिक वर्षात लोकप्रतिनिधींना २ हजार २१६ एनओसी दिल्या आहेत. या सर्व एनओसी फक्त सिमेंट रस्त्यांसाठी घेतल्या आहेत, हे विशेष. या कामांची अंदाजपत्रकीय रक्कम ३८२ कोटी १२ लाख ८२ हजार रुपये होत आहे.

६८८ कामे आतापर्यंत पूर्णमनपाकडून एनओसी मिळविण्यासाठी लोकप्रतिनिधींचे ‘दूत’ फाईलच्या पाठीमागेच असतात. जेवढ्या तत्परतेने एनओसी घेतली जाते तेवढ्या तत्परतेने काम होत नाही. दोन वर्षांत फक्त ६८८ कामे पूर्ण झाल्याची माहिती मनपाकडून देण्यात आली आहे.

४९ कामे प्रगतिपथावर, १३३८ शिल्लकमनपाकडून गेलेल्या एनओसीनुसार सध्या फक्त ४९ कामे प्रगतिपथावर आहेत. उर्वरित बहुतांश कामेच सुरू झालेली नाहीत. १३३८ कामे आजपर्यंत सुरूच झालेली नाहीत. ही कामे कधी सुरू होतील हे कोणालाच माहीत नाही.

१ वर्षानंतर १४१ कामे सुरू नाहीतलोकप्रतिनिधींनी विकासकामांसाठी मनपाकडून एक वर्षापूर्वी एनओसी घेतल्या. आजपर्यंत कामच सुरू केले नसल्याची धक्कादायक बाबही मनपाच्या एका अहवालात उघड झाली आहे.

डबल कामांचा मोठा धोकाअनेकदा मनपा नागरिकांच्या, माजी नगरसेवकांच्या मागणीनुसार सिमेंट रस्ता करून टाकते. तेथेच अगोदर एनओसी दिली हे लक्षात येत नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे संबंधिताकडून निव्वळ बिल दाखल करून पैसेही उचलले जाण्याचा धोका आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका