शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
2
आजचे राशीभविष्य : सोमवार १२ जानेवारी २०२६; या राशीचे लोक आज दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करू शकतील
3
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
4
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
5
अंबरनाथ, बदलापूर तो झाँकी हैं, कल्याण-डोंबिवली बाकी हैं! शिंदेसेनेला खिंडीत पकडण्याची खेळी
6
सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसले, नियंत्रण रेषेवर घुसखोरीची भीती, सुरक्षा दल हाय अलर्टवर
7
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
8
बाळासाहेब असते तर.. त्यांना आनंद झाला असता; पहिल्यांदाच राज यांनी बोलून दाखविली मनातील भावना
9
"मुंबईचे पुन्हा बॉम्बे करण्याचा डाव"; शिवाजी पार्कवरील सभेत उद्धव ठाकरेंचा आरोप
10
पुण्यातून निवडणूक लढवणार का?, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
11
"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
12
IND vs NZ : ना अनुष्का ना वामिका! जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी थेट ‘या’ व्यक्तीकडे पाठवतो विराट, म्हणाला…
13
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
14
WPL 2026 : अनुष्का शर्मानं 'फ्लाइंग शो'सह जेमीचा षटकार रोखला! अखेरच्या षटकात सोफीनं सामना फिरवला
15
कोणी अभिनेता, कोणी लावणी डान्सर तर कोणी राजकारणी; एका क्लिकवर वाचा 'बिग बॉस मराठी ६'मधील स्पर्धकांची संपूर्ण यादी
16
IND vs NZ : कोहली-गिलची फिफ्टी; वॉशिंग्टन लंगडत खेळला! KL राहुलनं सिक्सर मारत जिंकून दिला रंगतदार सामना
17
'अकबराच्या बापाचा बाप...', नाशिक कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
18
Virat Kohli Nervous Nineties Record : किंग कोहलीनं धमाका केला; पण शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं अन्...
19
BMC Elections 2026 : 'ठाकरे ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे, विचार संपत नसतो'; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
20
'सोनावणे वहिनी' फेम सोशल मीडिया स्टार करण सोनावणेची 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात धमाकेदार एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

४ दिवसांत ८ लाख वाहनांना कशी बसवणार ‘एचएसआरपी’ नंबरप्लेट? पुन्हा मुदतवाढ मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 17:00 IST

एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी खूप उशिराची अपाॅइंटमेंट मिळत आहे. त्यामुळे ही नंबर प्लेट बसविण्यासाठी पुन्हा एकदा मुदत वाढवून देण्याची मागणी वाहनधारकांतून होत आहे.

छत्रपती संभाजीनगर : एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व जुन्या वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (एचएसआरपी) लावण्यास १५ ऑगस्टची मुदत आहे. अद्यापही जिल्ह्यातील ८ लाख वाहनांना ही नंबरप्लेट बसवलेली नाही. त्यामुळे आगामी ४ दिवसांत या वाहनांना नंबरप्लेट बसणार कशी, असा सवाल आहे.

जिल्ह्यात फेब्रुवारीत एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी एजन्सी निश्चित झाली होती. आतापर्यंत दोन वेळा ही नंबर प्लेट बसविण्यासाठी मुदतवाढ मिळालेली आहे. आता पुन्हा एकदा मुदतवाढ मिळते का, याकडे वाहनधारकांचे लक्ष आहे.

एचएसआरपी नंबर प्लेटसाठी १५ ऑगस्टची मुदतएचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठीची अंतिम मुदत पूर्वी ३१ मार्च होती, त्यानंतर ३० जून करण्यात आली. आता १५ ऑगस्टची मुदत आहे.

जिल्ह्यात वाहने १२ लाख, एचएसआरपी ३ लाख वाहनांनाचजिल्ह्यात १ एप्रिल २०१९ पूर्वीची ९ लाख ५४ हजार वाहने आहेत. यात आतापर्यंत केवळ १ लाख २६ हजार २५२ वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यात आली. तर २ लाख १४ हजार ५५६ वाहनांनी नंबर प्लेट बसविण्यासाठी नोंदणी केली आहे.

पाच हजारांचा दंड बसणारया नंबर प्लेटसाठी नोंदणी केली नाही तर १५ ऑगस्टनंतर कारवाईचा बडगा बसणार आहे. नंबर प्लेट नसणाऱ्या वाहनाला ५ हजारांपर्यंत दंड बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मुदत वाढवण्याची मागणीएचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी खूप उशिराची अपाॅइंटमेंट मिळत आहे. त्यामुळे ही नंबर प्लेट बसविण्यासाठी पुन्हा एकदा मुदत वाढवून देण्याची मागणी वाहनधारकांतून होत आहे.

नोंदणी, कागदपत्रे अन् प्रक्रिया काय?वाहनधारकाने एचएसआरपीसाठी अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीवेळी वाहनाचा आरसी बुक, नोंदणी क्रमांक आणि चेसिस क्रमांक आवश्यक असतो. दिलेल्या तारखेला वाहन केंद्रावर आणून ही प्लेट बसवून घ्यावी लागते.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरRto officeआरटीओ ऑफीस