सर्वसामान्यांची एसटी किती सुरक्षित ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:19 IST2021-02-05T04:19:09+5:302021-02-05T04:19:09+5:30

* १० वर्षात विना अपघात बस चालविली म्हणून किती जणांचा सत्कार - १२ * १५ वर्षात विना अपघात बस ...

How safe is the ST for everyone? | सर्वसामान्यांची एसटी किती सुरक्षित ?

सर्वसामान्यांची एसटी किती सुरक्षित ?

* १० वर्षात विना अपघात बस चालविली म्हणून किती जणांचा सत्कार - १२

* १५ वर्षात विना अपघात बस चालविली म्हणून किती जणांचा सत्कार - ४

औरंगाबाद : प्रवासासाठी आता बहुपर्याय निर्माण झाले आहेत; पण सर्वात सुरक्षित प्रवास आजही एसटीचाच मानला जातो. त्याचे कारणही तसेच आहे, जिल्ह्यात एसटीचे १२०० चालक आहेत. मागील वर्षात ४६ अपघात झाले असून, त्यातील २५ अपघात हे किरकोळ आहेत.

उल्लेखनीय, म्हणजे ६९ वाहनचालक असे आहेत की, त्यांनी मागील ५ ते ३० वर्षात विना अपघात बस चालविली आहे.

सध्या रस्ते सुरक्षा अभियान सुरू आहे. सुरक्षित प्रवासासाठी एसटी महामंडळालाच आजही प्रवासी प्राधान्य देतात. कारण, एसटी महामंडळात प्रशिक्षण दिल्यानंतरच प्रवाश्यांसह बस चालविण्याची परवानगी दिली जाते. एसटी महामंडळाकडे जिल्ह्यात १२०० चालक आहेत. त्यापैकी ३० वर्ष विना अपघात बस चालविणारे ७ चालक आहेत. एकही अपघात न करता २५ वर्ष बस चालविणारे १७ चालक, २० वर्ष विना अपघात बस चालविणारे ४ चालक, १५ वर्ष विना अपघात बस चालविणारे ४ तर १२ चालक असे आहेत की, त्यांनी मागील १० वर्षात त्यांच्या हातून एकही अपघात झाला नाही. १४ वाहनचालकांनी मागील ५ वर्षात विना अपघात बस चालवत प्रवाशांना सुरक्षित व सुखरूप प्रवासाचा आनंद दिला आहे.

चौकट

७० ला स्पीड लॉक

एसटी बसला तशी ७० कि.मी चालविण्याची मर्यादा आहे. मीटर ७०च्या स्पीडला लॉक करून ठेवले आहे. त्यापेक्षा अधिक वेगाने चालकांना बस चालविता येत नाही. तरी अपघात होतात, एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जे अपघात होतात, त्यात किरकोळ अपघाताचे जास्त प्रमाण असते. जे अपघात घडतात त्यात सायंकाळच्या गर्दीच्या वेळी जास्त अपघात घडल्याचे निदर्शनास आले आहे. त्यात दुचाकीस्वाराच्या चुकीने अपघात जास्त घडतात. कारण, दुचाकी चुकीच्या दिशेने चालविणे, अचानक ब्रेक लावल्यानंतर पाठीमागील वाहन येऊन धडकने या प्रकारचे अपघात जास्त होतात.

(जोड )

Web Title: How safe is the ST for everyone?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.