शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

लड्डा दरोड्यात सोने गेले किती? पालकमंत्र्यांचा आधी गौप्यस्फोट, नंतर सुर बदलला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 12:22 IST

फक्त दाखवलेलेच सोने समोर, दरोड्यात ‘रेकॉर्डपेक्षा’ अधिक सोने लुटले गेल्याचा संजय शिरसाट यांचा गौप्यस्फोट

छत्रपती संभाजीनगर : बजाजनगर, आर. एल. सेक्टरमधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर पडलेल्या दरोड्यात केवळ 'रेकॉर्डवरीलच सोने समोर आले आहे, नोंदवलेल्यापेक्षा अधिक सोने गेल्याची माहिती माझ्याकडे आहे', असे धक्कादायक विधान पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केले. या विधानाच्या तासाभरातच त्यांनी पोलिस आयुक्तालयात आयुक्त प्रवीण पवार यांच्यासोबत बंद दाराआड अर्धा तास चर्चा केली. या चर्चेनंतर मात्र शिरसाट यांच्या आरोपाचा सूर बदलला आणि पोलिसांनी योग्य कारवाईचे आश्वासन दिल्याचे स्पष्ट केले.

१५ मे रोजी लड्डा यांच्या घरावर पडलेला दरोडा आणि त्याचा सूत्रधार अमोल खोतकर याचे एनकाउंटर सध्या राज्यभरात चर्चेचा विषय बनला आहे. पोलिसांकडून अद्यापही याविषयी गुप्तता पाळली जात असताना, दरोड्यात लुटलेल्या मुद्देमालाविषयी पालकमंत्र्यांच्या धक्कादायक वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. गुरुवारी दुपारी शिरसाट यांनी माध्यमांशी विविध विषयांवर चर्चा करत असताना दरोड्याबाबत वक्तव्य केले की, लड्डा यांच्या घरातून केवळ रेकॉर्डवरील सोन्याचे दागिने समोर आले. मात्र, नोंदवल्यापेक्षा अधिक सोने चोरीला गेल्याचा दावा त्यांनी केला. पोलिस अधिकाऱ्यांनी मात्र याविषयी प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट नकार दिला.

तासाभरात बंद दाराआड चर्चासकाळी ११ वाजता पत्रकार परिषदेत शिरसाट यांनी हे वक्तव्य केले. त्यानंतर दुपारी १ वाजता त्यांनी पोलिस आयुक्तालय गाठले. गुन्ह्यांचा आढावा बैठक असल्याचे सांगत त्यांनी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्याशी जवळपास अर्धा तास एकट्यात चर्चा केली.

काय म्हणाले शिरसाट?माझी आयुक्तांसोबत गुन्हेगारी, बजाजनगर दरोड्याविषयी चर्चा झाली आहे. माझ्याकडे असलेली माहिती मी त्यांना दिली आहे. पोलिस ॲक्टिव्ह मोडवर आले आहेत. दरोड्यात पोलिसांचा सहभाग असल्यास कारवाईचे आश्वासन पवार यांनी दिले आहे. तुम्हाला आता गुन्हेगार पळताना, कारागृहात जाताना दिसतील. मी एनकाउंटर का केले, कसे केले याची माहिती घेतली. दरोड्याचा योग्य दिशेने तपास सुरू आहे. शिवाय, पोलिसांनी कुठल्याही दबावाला दाद देऊ नये, नागरिकांना आत्मविश्वास द्यावा, सरकारचे पोलिसांना सहकार्य असेल.- संजय शिरसाट, पालकमंत्री

मी कष्टाची कमाई गमावलीदरोड्याविषयी उद्योजक संतोष लड्डा यांनी पोलिसांच्या तपासावर समाधान व्यक्त केले. माध्यमांशी बोलताना त्यांनी गमावलेल्या सोन्याविषयी मात्र दुःख व्यक्त केले. “मी ३० वर्षांत कष्टाने कमावलेले सोने गमावले. माझ्या पत्नीला दागिन्यांची आवड आहे. तपास काय सुरू आहे हे माहिती नाही. पण, पोलिस प्रामाणिकपणे तपास करत आहेत. त्यामुळेच आरोपी पकडले गेले. जे सोने गेले ते सर्व कागदोपत्री आहे. असे कधी होईल, असे वाटले नाही. ते घरात ठेवण्याचेही विशेष कारण नव्हते. माझ्या जवळच्या एकाही व्यक्तीवर संशय नाही,” असेही लड्डा यांनी स्पष्ट केले.

२० दिवसांत पुन्हा पोलिस आयुक्तालयात९ मे रोजी शिरसाट यांनी पोलिस आयुक्तालयात वाढत्या गुन्हेगारीबाबत बैठक घेत सर्व अधिकाऱ्यांना फैलावर घेतले होते. आता २० दिवसांतच त्यांनी पुन्हा गुन्हेगारीचा आढावा बैठकीचे कारण सांगत आयुक्तालय गाठले. यावेळी मात्र केवळ आयुक्तांसोबत बंद दाराआड चर्चा केली.

टॅग्स :Robberyचोरीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरSanjay Shirsatसंजय शिरसाटCrime Newsगुन्हेगारी