शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगपती लड्डा यांच्या घरावरील दरोड्यात सोने खरेच गेले किती? आता पाेलिसही संभ्रमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 19:53 IST

मुदत उलटूनही लड्डांकडून दागिन्यांच्या पावत्या सादर नाहीच, २ जूनपर्यंत पोलिसांनी दिली होती वेळ

छत्रपती संभाजीनगर : बजाजनगरमधील संतोष लड्डा यांच्या घरावर पडलेल्या दरोड्यात नेमके किती सोने, चांदी लुटले गेले, याविषयी पोलिसही संभ्रमात आहेत. अटकेतील १२ आरोपींची कसून चौकशी सुरू असूनही अपेक्षित ५.५ किलो सोने व ३२ किलो चांदीची माहितीच पोलिसांना मिळालेली नाही. आता एन्काउंटर झालेल्या अमोल खोतकरच्या जवळील व्यक्तींच्या चौकशीवरच दागिन्यांच्या जप्तीची दिशा अवलंबून असल्याचे पोलिसांनी सांगितले.

३१ मे रोजी गुन्हे शाखेने या प्रकरणाचा मोठा उलगडा केला. सलग १५ दिवस चाललेल्या या तपासात १२ आरोपी पकडण्यात आले. ३३ तोळे सोने जप्त करण्यात आले. एन्काउंटर झालेल्या अमोलच्या कारमधून ४ तोळे सोने जप्त करण्यात आले. मात्र, गेल्या १३ दिवसांपासून आरोपी पोलिसांच्या ताब्यात असताना किमान ५० तोळे सोने देखील पोलिसांच्या हाती लागलेले नाही. त्यामुळे सोने, चांदी नेमके गेले किती, या संभ्रमात पोलिस आहेत.

तपासावरच प्रश्चचिन्हसोन्याचा व्यवहार केलेल्यांपैकी आणखी दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. रविवारी सुरेश ऊर्फ सूर्यकांत रामकिसन गंगणे (रा. अंबाजोगाई) याच्या पत्नी व सासऱ्याला अटक करण्यात आली. सोने विकून त्यांना मिळालेले ८ लाख रुपये जप्त केल्याचा दावा पोलिसांनी केला. मात्र, गंगणेने सोने किती ग्रॅम विकले, कोणत्या सराफाला विकले, याचा उलगडाच न केल्याने तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दागिन्यांच्या शोधाबाबत पथके पुन्हा जिल्ह्याबाहेर जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

आतापर्यंत पकडलेले आरोपीयाेगेश सुभाष हाजबे, सय्यद अजहरोद्दीन सय्यद कबिरोद्दीन, महेंद्र माधव बिडवे, देवीदास नाना शिंदे, बालासाहेब चंद्रकांत इंगोले, महेश दादाराव गोराडे, गणेश गंगाधर गोराडे, आजिनाथ पुंजाराम जाधव (सर्व रा. वाळूज महानगर परिसर), सुरेश ऊर्फ सूर्यकांत रामकिसन गंगणे, त्याची पत्नी बबिता, सासरा भारत कांबळे, सोहेल जलील शेख (सर्व रा. अंबाजोगाई).

२ जूनपर्यंत मागितला होता वेळलड्डा यांनी २ जूनपर्यंत दागिन्यांच्या पावत्या सादर करण्यासाठी वेळ मागितली होती. मात्र, मुदत उलटूनही त्यांनी एकही पावती सादर केली नाही. सामान्यांबाबत पावतीशिवाय गुन्हा दाखल न करणारे पोलिस लड्डा यांच्याबाबत मात्र सौजन्याची भूमिका घेत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरRobberyचोरीCrime Newsगुन्हेगारी