शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
3
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
4
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
5
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
6
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
7
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
8
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
9
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
10
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
11
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
12
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
13
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
14
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
15
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
18
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
19
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
20
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप

वॉटर ग्रीडच्या पहिल्या टप्प्यात किती तालुक्यांना पाणी देता येईल; जीवन प्राधिकरणास अहवाल सादर करण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2020 4:04 PM

वॉटर ग्रीडच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारची पाऊले 

ठळक मुद्देपाणी पुरवठ्याबाबत अहवाल सादर करण्याच्या राज्य शासनाच्या सूचनासध्या मराठवाड्यात १५० टीएमसी पाण्याची तूट....

- संजय जाधव

पैठण : मराठवाड्यातील २ कोटी जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा कायम स्वरूपी प्रश्न निकाली काढणाऱ्या मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने पावले उचलले आहेत. मराठवाडा वॉटर ग्रीड या प्रस्तावित प्रकल्पा अंतर्गत पहिल्या टप्प्यात जायकवाडी धरण क्षेत्रातील पैठण तालुक्यासह  उजणी धरण क्षेत्रातील लातूर जिल्ह्यातील किती तालुक्याला पाणी पुरवठा करता येईल याचा अंमलबजावणी  अहवाल सादर करण्याच्या सूचना राज्याचे मुख्य सचिव यांच्या आदेशानुसार पाणीपुरवठा मंत्रालयाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिक्षक अभियंता यांना दिले आहेत. दि २३ फेब्रुवारी रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपरोक्त निर्णय घेण्यात आला आहे. 

मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाला महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिल्याची चर्चा होत असतानाच राज्य मंत्रीमंडळाने घेतलेल्या या निर्णयाने  मराठवाड्याला दिलासा मिळाला आहे. वॉटर ग्रीड योजने अंतर्गत प्रशासकीय स्तरावर हालचाली झाल्याने पैठणसह  औरंगाबाद लातूर उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील टंचाई ग्रस्त गावांना दिलासा मिळणार आहे.

मराठवाड्यातील धरणांना जोडण्यासाठी १३३० किमीची पाईपलाईनमराठवाड्याच्या सुमारे २ कोटी लोकसंख्येच्या पिण्याच्या पाण्याचा कायमचा प्रश्न सोडविण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड या महत्वाकांक्षी योजनेचे काम प्रस्तावित आहेत. या योजनेंतर्गत १ हजार  ३३० किलोमीटरची मुख्य पाइपलाईन टाकण्यात येणार असून जायकवाडी, निम्न दूधना, सिध्देश्वर, येलदरी, इसापूर, विष्णूपुरी, माजलगाव, निम्न मनार, मांजरा, निम्न तेरणा व सिना कोळेगाव या ११ धरणांना लूप पध्दतीने जोडण्यात येणार आहे. धरणे जोडल्या नंतर जलशुद्धीकरणाची प्रक्रिया करून विविध तालुक्यापर्यंत शुद्ध पाणी वाहून नेण्यासाठी ३ हजार २२० किलोमीटर दुय्यम पाईपलाईन प्रस्तावित आहे.पाणी टंचाईने होरपळलेल्या मराठवाड्यासाठीवॉटर ग्रीड योजना जीवनदायी ठरणार असल्याने मराठवाड्यातील कोट्यावधी जनतेचे लक्ष या योजनेचा अंमलबजावणी कडे लागले आहे. ऑक्टोबर २०१६ मध्ये तत्कालीन भाजप शिवसेनेच्या सरकारने मराठवाडा वॉटर ग्रीडची घोषणा केली.  इस्त्रायलमधील मेकोरोट डेव्हलपमेंट अँड एंटरप्रायजेस या कंपनीने राज्य सरकारला अहवाल सादर केलेला आहे. 

कोकणातील नद्यांचे पाणी मराठवाड्यात वळविणार....मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी  कोकणातील (पश्चिम वाहिनी) नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बाबत नेमलेल्या अभ्यास समितीने २०१९ मध्ये  सरकारला अहवाल सादर केला आहे. कोकणातील अंबिका, औरंगा, नार-पार, दमणगंगा-वैतरणा, वैतरणा, उल्हास दमणगंगा नद्यांच्या खोऱ्यातून  मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी आनण्यात येणार आहे. दमणगंगा खोऱ्यातून दहा टीएमसी, वैतरणा खोऱ्यातून पाच टीएमसी आणि उत्तर कोकणाील नद्यांतून १०० टीएमसी पाणी असे सुमारे ११५ टीएमसी पाणी मराठवाड्यात आणले जाऊ शकते असे अभ्यास समितीने अहवालात म्हटले आहे. 

सध्या मराठवाड्यात १५० टीएमसी पाण्याची तूट....मराठवाड्यात सिंचनासाठी ३६० टीएमसी व बिगर सिंचन ६५ टीएसमी असे मिळून ४२५ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. सध्या मराठवाड्यात  २७५ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. मराठवाड्यात १५० टीएमसी व जायकवाडी धरणात ३० टीएमसीची तूट असल्याचे अभ्यास समितीने अहवालात म्हटले आहे. हि तूट कोकणातील पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी मराठवाड्यात आणून भरण्याचा मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेचा उद्देश आहे.

टॅग्स :Marathwada Water Gridमराठवाडा वॉटर ग्रीडMarathwadaमराठवाडाJayakwadi Damजायकवाडी धरणState Governmentराज्य सरकार