काँग्रेसच्या शहर कार्यकारिणीसाठी आणखी किती विलंब होणार?
By Admin | Updated: November 9, 2016 01:36 IST2016-11-09T01:30:01+5:302016-11-09T01:36:50+5:30
औरंगाबाद : अॅड. सय्यद अक्रम यांच्या जागी शहर काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नियुक्त झालेले नामदेव पवार यांच्याकडून कार्यकारिणी गठीत करण्यास किती विलंब होणार आहे,

काँग्रेसच्या शहर कार्यकारिणीसाठी आणखी किती विलंब होणार?
औरंगाबाद : अॅड. सय्यद अक्रम यांच्या जागी शहर काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नियुक्त झालेले नामदेव पवार यांच्याकडून कार्यकारिणी गठीत करण्यास किती विलंब होणार आहे, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
काल गांधी भवनात स्वत: नामदेव पवार यांनीच पुढाकार घेऊन दीपावली स्नेहमिलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रदेश काँग्रेसचे सचिव असलेले अशोक चव्हाण यांनी हा मुद्दा उपस्थित करून आता शहर कार्यकारिणी लवकरात लवकर जाहीर करण्यात यावी,अशी अपेक्षा व्यक्त केली होती, तर इकडे पवार हे वॉर्डा-वॉर्डात जाऊन जुन्या-नव्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत; पण काही काही वॉर्डांत काँग्रेसचे कार्यकर्तेच नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. या संवादयात्रा कधी संपणार आणि शहर कार्यकारिणी कधी अस्तित्वात येणार याची कार्यकर्ते प्रतीक्षा करीत आहेत.
अॅड. सय्यद अक्रम यांची कार्यकारिणी जंबो होती. नामदेव पवार यांची कार्यकारिणी किती मोठी राहणार अशी चर्चा आहे. आता संवादयात्रा संपवून पवार यांनी कार्यकारिणी जाहीर करून पदाधिकाऱ्यांना कामाला लावले पाहिजे, आधीच विलंब झाला आहे. आणखी किती विलंब करणार अशी चर्चा होत आहे.
प्रदेश काँग्रेसलाही आता औरंगाबाद शहर कार्यकारिणी अस्तित्वात यावी, असे वाटत असेल म्हणूनच अशोक सायन्ना यांनी लवकर कार्यकारिणी गठीत करण्याचे सूचित केले, असे मानले जात आहे.