अल्प पेन्शनमध्ये जगायचे तरी कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2016 01:20 IST2016-07-20T23:57:13+5:302016-07-21T01:20:40+5:30
औरंगाबाद : अल्प पेन्शनमुळे महागाईच्या दिवसात जगायचे कसे, असा प्रश्न उपस्थित करून पेन्शनधारकांनी बुधवारी शांती मोर्चा काढला.

अल्प पेन्शनमध्ये जगायचे तरी कसे?
औरंगाबाद : अल्प पेन्शनमुळे महागाईच्या दिवसात जगायचे कसे, असा प्रश्न उपस्थित करून पेन्शनधारकांनी बुधवारी शांती मोर्चा काढला. महागाई भत्त्यासह मासिक ७,५०० रुपये पेन्शन न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला.
शहागंज येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी मोर्चास हिरवा झेंडा दाखविला. शहागंज, चेलीपुरामार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. अल्प पेन्शनधारकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे यांना निवेदन सादर केले. त्यानंतर मोर्चा विभागीय आयुक्तालयावर धडकला. मोर्चेकऱ्यांनी तेथे जोरदार घोषणाबाजी केली. विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. मोर्चाचे रूपांतर छोटेखानी जाहीरसभेत झाले. ईपीएस-९५ निवृत्त कर्मचारी समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष पी.पी. देशमुख, सरचिटणीस अॅड. सुभाष देवकर, सल्लागार स.सो. खंडाळकर यांची यावेळी भाषणे झाली.
मोर्चामध्ये विविध निमसरकारी संस्था, कंपन्यांच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. ग्रामीण भागातूनही अल्पपेन्शनधारक मोठ्या संख्येने आले होते. रामचंद्र नवपुते, नीळकंठ वरकड, रामराव बोर्डे, हिरामण चव्हाण, चंद्रकांत पोतदार, निर्मला बडवे, माधुरी जोशी, पुष्पा चव्हाण, शारदा देवकर, पुष्पा काळे, कमल मते, शशिकला जोशी, अरविंद अवसरमोल, कांतराव मोदी, व्ही.आर. चव्हाण, जी.व्ही.गाडेकर, डी.के.पाटील, रमेश भालेराव, तेजराव मिरगे, धनसिंग परदेशी, अंगद सरवदे, टी.वाय. देशमुख, डी.एस. वाळेकर आदी मोर्चात सहभागी झाले होते.