घरकुलांची कामे रखडली

By Admin | Updated: June 24, 2014 00:41 IST2014-06-24T00:31:38+5:302014-06-24T00:41:36+5:30

प्रदीपकुमार कांबळे, लोहा शासनामार्फत आर्थिकदृष्ट्या घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी दारिद्रय रेषा कुटुंबातील लाभार्थ्यांसाठी इंदिरा आवास योजनेअंतर्गत घरकूल बांधणीसाठी अर्थसहाय्य करण्यात येते़

Housekeeping work | घरकुलांची कामे रखडली

घरकुलांची कामे रखडली

प्रदीपकुमार कांबळे, लोहा
शासनामार्फत आर्थिकदृष्ट्या घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी दारिद्रय रेषा कुटुंबातील लाभार्थ्यांसाठी इंदिरा आवास योजनेअंतर्गत घरकूल बांधणीसाठी अर्थसहाय्य करण्यात येते़ सन २०११ ते २०१४ या कालावधीदरम्यान एकूण १ हजार २३२ घरकुलांना मंजुरी देण्यात आली़ मात्र प्रत्यक्षात केवळ ६३३ घरकुलांची कामे पूर्ण झाली व उर्वरित ५९९ घरकुलांचे काम प्रशासनातील जबाबदार अभियंता-अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे रखडले असल्याची बाब समोर आली आहे़
ग्रामीण भागाचे मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेली पंचायत समिती सध्या या ना त्या कारणाने चर्चेत असते़ त्याच या बाबीकडे सभापतीचे दुर्लक्ष होत असल्याचे पहावयास मिळत आहे़ लोहा तालुक्यातील १२६ गावांतील विकास पं़स़ अंतर्गत विविध योजनेअंतर्गत करण्यात येतो़ शासनाकडून गरीब व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या दारिद्रय रेषेखालील कुटुंबाचे जीवनमान उंचावण्यासाठी उदात्त भावनेतून पुढे आलेली इंदिरा आवास योजना कार्यान्वित आहे़ सन २०११-१२ या कालावधीदरम्यान ४५४ घरकूल मंजूर करण्यात आले़ पैकी १८७ पूर्ण तर २६७ घरकूल अपूर्ण राहिले़ सन २०१२-१३ या कालावधीत ६३५ घरकुलांना मंजुरी देण्यात आली़ त्यात ३३१ घरकुल पूर्ण झाले़ तर ३०४ अपूर्ण राहिले व सन २०१३-१४ मध्ये एकूण १४३ घरकुल मंजूर झाले़ पैकी ८१ घरकुल पूर्ण तर ६२ अपूर्ण राहिले़
सन २०११-१२ व २०१२-१३ या कालावधीदरम्यान घरकुल बांधण्यासाठी ६८ हजार ५०० रुपये अनुदान देण्यात येत होते़ तर सन २०१३-१४ या कालावधीत ९५ हजार रुपये इतके अनुदान मंजूर करण्यात आले़ सन २०११-१२ मध्ये अपूर्ण घरकुलांचे गाव व संख्या पुढीलप्रमाणे- सुनेगाव-६, ढाकणी-११, बेरळी-११, दगडगाव-१६, जोशीसांगवी-१७, बोरगाव (कि़)-१५, कापशी खु़-११, सुगाव-१९, माळेगाव (या़)-८, हातणी-६, चितळी-२, बोरगाव-१, आंबेसांगवी-२, वाळकी (खु़)-७, खांबेगाव-३, नांदगाव-८, पांगरी-८, वाळकी (बु़)-२, कदमाचीवाडी-१, पळश्ी-४, येळी-१, रायवाडी-२, शेवडी बा़-१६, कलंबर-१२, हरबळ-१, धनज(खु़)-२, बोरगाव-१़ सन २०१२-१३ कालावधीत अपूर्ण घरकूल- हिंदोळा-१०, बामणी-१, पिंपळदरी-४, लांडगेवाडी-३, लिंबोटी-११, कलंबर खु-४, देवलातांडा-१०, हिराबोरीतांडा-७, धानोरा(शे़)-१०, दगडगाव-१०, कापशी (खु़)-१६, नगारवाडी-८, अंतेश्वर-१५, निळा-१२, पोखरी-३, हरणवाडी-पूर्ण अपूर्ण १९, वागदरवाडी-४, पिंपळगाव (ए़)- पूर्ण १, सोनखेड-३०, डेरला-१२, डोलारा-१८, टाकळगाव-९, खडकमांजरी-१५, ढाकणी-५, जानापुरी-११, सुगाव-१६, घुगेवाडी-१३, हरसद-७, कापशी-२३, कामळज-५, मारतळा- पूर्ण २३ अपूर्ण, धनज (बु़)-१९,जवळा-पूर्ण २३, चितळी १३, डोणवाडा-१़
सन २०१३-१४ कालावधीतील अपूर्ण घरकूल- डोणवाडा-१९, धनज-१३, पोखरभोसी-२०, रिसनगाव-१६, गोळेगाव- पूर्ण, लव्हराळ १३, भारसावडा - पूर्ण ६ अपूर्ण़ ग्रामीण भागातून लाभार्थी पैसे खर्च करून पं़स़मध्ये अनेकवेळा चकरा मारून देखील त्या लाभार्थ्यांची दखल घेण्याची तसदी अधिकारी किंवा कर्मचारी घेत नाहीत़ तुटपूंज्या अनुदानावर लाभार्थी घरकूल पूर्ण करतो़ परंतु कागदपत्राच्या भानगडीत त्यास कर्मचाऱ्यांकडून अडकवून त्याचे काम करण्यास टाळाटाळ करण्यात येते़ पं़स़चे गटविकास अधिकारी मुख्यालयी न राहता बाहेरगावाहून ये-जा करत असल्यामुळे त्यांना या गंभीर बाबीकडे लक्ष देण्यास वेळच मिळत नाही़ त्याचा फायदा घेत कर्मचारी कामात हलगर्जीपणा करत सर्वसामान्यांना वेठीस धरतात़ गटविकास अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांवर अंकुश नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचे फावते़ मात्र सर्वसामान्यांची फरफट होत आहे़ वरिष्ठांनी गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी पुढे येत आहे़
गत तीन वर्षांपासून रखडलेली घरकुलाचे कामे पूर्ण करण्यासाठी वरिष्ठांनी सूचना दिल्या असून अभियंता व कर्मचाऱ्यांकडून कागदोपत्राची प्रक्रिया दोन महिन्यात पूर्ण करण्यात येवून अपूर्ण घरकूल लवकरच पूर्णत्वास जाणार आहेत - व्ही़एऩ रंगवाळ (गटविकास अधिकारी)
लाभार्थ्यांची दयेयकेही अडकली
तालुक्यातील ५९९ अपूर्ण घरकूल संख्या असल्याची माहिती पं़स़तून देण्यात आली़ तीन-तीन वर्षापासून घरकुलाचे काम अपूर्ण असल्याचे सांगून लाभार्थ्यांना बील अदा करण्यात आली नाहीत़ वास्तविकता घरकूल काम पूर्ण होण्यासाठी लाभार्थ्यास घरकुलासह शौचालय बांधणे गरजेचे असल्यामुळे लाभार्थ्यांना अनुदानाचा श्ेवटचा हप्ता देण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले़ मात्र लाभार्थ्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना चिरीमिरी दिल्याशिवाय कामाचे बील अदा केले जात नसल्याचे लाभार्थ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले़

Web Title: Housekeeping work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.