अनुदान उचलूनही घरकुल रखडविले
By Admin | Updated: May 12, 2014 00:10 IST2014-05-11T23:10:26+5:302014-05-12T00:10:19+5:30
लातूर: इंदिरा आवास, रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल बांधकामाचे पैसे उचलून लातूर तालुक्यातील ४५ गावांतील २0३ लाभार्थ्यांनी काम अपूर्ण ठेवले आहे.

अनुदान उचलूनही घरकुल रखडविले
लातूर: इंदिरा आवास, रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल बांधकामाचे पैसे उचलून लातूर तालुक्यातील ४५ गावांतील २0३ लाभार्थ्यांनी काम अपूर्ण ठेवले आहे. पहिला हप्ता उचलूनही काम न करणार्या लाभार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. यासंदर्भात गटविकास अधिकार्यांनी ग्रामसेवकांना गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच बांधकाम पूर्ण करून शौचालय न बांधणार्या लाभार्थ्यांकडून वसुली करण्यात येणार आहे. लातूर तालुक्यातील ४५ गावांत २0३ लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम केले. पैसेही उचलले मात्र शौचालयाचे बांधकाम केले नाही. २00६-0७ मध्ये १३, २00७-८ मध्ये २७, २00८-0९- ५३, २00९-१0 मध्ये १४, २0१0-११ मध्ये ११, ११-१२ मध्ये ३0, २0१२-१३ मध्ये ५५ लाभार्थ्यांनी शौचालयाचे काम पूर्ण न करताच रक्कम उचलली आहे. काही लाभार्थ्यांना ५ वर्षांपेक्षा अधिक कालावधी लोटला तरीही अद्याप शौचालय बांधले नसून ७ वर्षांत तब्बल २0३ जणांनी शौचालय बांधकामाकडे पाठ फिरविली आहे. वारंवार सूचना देऊनही कामे पूर्ण करण्यात येत नसल्याने प्रशासनाने आता कारवाईचा बडगा उगारला आहे. अपूर्ण घरकुल पुर्ण करणे अथवा लाभार्थ्यांच्या सातबार्यावर बोजा चढविण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. शनिवारी पंचायत समितीतील कर्मचार्यांची बैठक घेऊन आगामी वर्षात करावयाच्या कामाबाबत बीडीओंनी सूचना केल्या आहेत. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम.बी.कुलकर्णी, उपअभियंता शेळके, यादव, सर्व विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, अंगणवाडी पर्यवेक्षिका आदींची उपस्थिती होती. यावेळी शाळांमध्ये वृक्षलागवड, इमारतींमध्ये जलपुनर्भरण, लेक शिकवा अभियानासाठी एक दिवसांचे वेतन, ५६ ग्रामपंचायतीमध्ये फेर करआकारणी आदींचा आढावा घेण्यात आला. (प्रतिनिधी) ६१ जणांनी पैसे उचलले २00९ ते २0१४ या पाच वर्षाच्या काळात तालुक्यातील ६१ लाभार्थ्यांनी घरकुल बांधकामाचा पहिला हप्ता उचलला. मात्र अद्याप कामाला सुरूवात केली नाही.. अशा लाभार्थ्यांंवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना गटविकास अधिकारी धन्वंतकुमार माळी यांनी ग्रामसेवकांना शनिवारी दिल्या आहेत. संपूर्ण रक्कम उचलून घरात राहण्यासाठी गेलेल्या २0३ लाभार्थ्यांनी शौचालय बांधले नाही, अशा लाभार्थ्यांंनी शौचालय न बांधल्यास त्यांच्याकडून शासनाकडून देण्यात आलेली रक्कम वसूल करण्यात येणार आहे. आठ दिवसांची मुदत घरकुलाचा पहिला हप्ता उचलून कामे सुरू न करणार्या लाभार्थ्यांंना अनेकदा सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र अद्याप ६१ लाभार्थ्यांंनी कामे सुरूच केली नाही. त्यामुळे ग्रामसेवक संबंधित लाभार्थ्यांंना आठ दिवसांत बांधकाम सुरू करण्याच्या लेखी सूचना देतील, त्यानंतरही त्यांनी काम सुरू न केल्यास त्या लाभार्थ्यांंवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी धन्वंतकुमार माळी यांनी सांगितले.