अंत्यविधीसाठी गेलेल्या अभियंत्याचे घर फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:06 IST2021-01-03T04:06:51+5:302021-01-03T04:06:51+5:30

काजी मोहम्मद मुनीरूद्दीन काजी मोहम्मद जलालोद्दीन (वय २६, रा. गल्ली क्र. ९, बारी कॉलनी, रोशनगेट) हे काकाचे निधन झाल्याने ...

The house of the engineer who went for the funeral was broken into | अंत्यविधीसाठी गेलेल्या अभियंत्याचे घर फोडले

अंत्यविधीसाठी गेलेल्या अभियंत्याचे घर फोडले

काजी मोहम्मद मुनीरूद्दीन काजी मोहम्मद जलालोद्दीन (वय २६, रा. गल्ली क्र. ९, बारी कॉलनी, रोशनगेट) हे काकाचे निधन झाल्याने अंत्यविधीसाठी कुटुंबीयांसह ३१ डिसेंबर रोजी सकाळी आठच्या सुमारास बाहेरगावी गेले होते. ही संधी साधून भरदिवसा चोराने त्यांच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर चोरांनी लेडीज पर्समधील दहा हजार रुपये आणि वरच्या मजल्यावरील तीन रुमपैकी एका खोलीतील दोन कपाटाच्या ड्रॉव्हरमधील एक तोळ्याच्या दोन अंगठ्या, प्रत्येकी पाच ग्रॅमचे दोन टाॅप्स, अडीच तोळ्याच्या दोन बांगड्या असा दीड लाखांचा ऐवज लांबविला. हा प्रकार उघडकीस आल्यावर काजी यांनी जिन्सी पोलीस ठाणे गाठत शुक्रवारी रात्री तक्रार दिली. या प्रकरणाचा अधिक तपास उपनिरीक्षक दत्ता शेळके करीत आहेत.

Web Title: The house of the engineer who went for the funeral was broken into